सोलापूर मध्य

सोलापूर : विडी, यंत्रमाग, गारमेंटसह अन्य लहान-मोठे उद्याोग, झोपडपट्ट्या, श्रमिकांच्या वसाहती, अल्पसंख्याकांनी वेढलेले मोहल्ले, तेलुगू भाषकांची ताकद, जांबवीर मोची व व अन्य विविध समाजघटकांनी विखुरलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित काँग्रेसच्या विरोधात भाजपचा प्रभाव वाढला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेला हा मतदारसंघ हिसकावून घेण्यासाठी भाजपने आपला आवडता धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग वेगाने चालविला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पूर्वी वर्षानुवर्षे काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या आणि दोन वेळा माकपने तर एकदा शिवसेनेने प्राबल्य मिळवलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून अलीकडे २००९ पासून सलग तीन वेळा खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले. विशेषत: २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन वेळा एमआयएमचा अडचणीचा ठरलेला झंजावात मोठ्या चिकाटीने परतावून लावणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांना या स्वत:च्या घरच्या मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ ७९६ मतांची अत्यल्प आघाडी मिळाली. हे मताधिक्य रोखण्यात भरीव यश मिळविता आल्याने भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे.

हेही वाचा >>> मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत; ‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका

यापूर्वी काँग्रेसच्या माध्यमातून शहराचे राजकारण अनेक वर्षे हाताळलेले दिवंगत नेते विष्णुपंत कोठे यांचे नातू देवेंद्र राजेश कोठे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच स्वत:चे वलय निर्माण करून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळविली. पद्माशाली समाजाचे देवेंद्र कोठे हे लोकसभा निवडणुकीत जहाल, धार्मिकदृष्ट्या चिथावणीखोर विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते.

निर्णायक मुद्दे

●मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राजकीय लाभ पदरात पाडून घेण्यासाठी महायुती आशावादी आहे. मुस्लीम, तेलुगु पद्माशाली, जांबवीर मोची, आंबेडकरी समाज, अन्य दलित, ओबीसी, मराठा, लिंगायत, ब्राह्मण अशा अनेकविध समाज घटकांपैकी मुस्लीम, पद्माशाली, दलित आणि ओबीसी हे घटक निर्णायक आहेत.

लोकसभेतील राजकीय चित्र

महाविकास आघाडी ९०,४६८ 

महायुती ८९,६७२

Story img Loader