अलिबाग- शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची खेळी शरद पवार यांनी श्रीवर्धन मतदारसंघात केली आहे. मात्र काँग्रेस मधील बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अडचणी वाढणार आहे. मविआतील बंडखोरी अंतर्गत कुरबुरी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेच्या पथ्यावर पडू शकणार आहे.

२००९ च्या मतदारसंघ पुर्नरचनेत माणगाव मतदारसंघ नाहीसा झाला. त्यामुळे काँग्रेसच्या श्रीवर्धन मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितले. त्यामुळे बॅरिस्टर ए आर अंतलेचा हा मतदारसंघ सुनील तटकरे यांच्या ताब्यात गेला. तेव्हा पासून आज पर्यंत श्रीवर्धनवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. सत्ता आणि विकासकामांच्या जोरावर विरोधी पक्षांवर अंकूश निर्माण करण्यात तटकरे कुटूंबाला यश आले आहे. तीन निवडणूकीत तटकरे कुटुंबातील तीन सदस्य या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. यंदा आदिती तटकरे दुसऱ्यांना मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
Uddhav Thackeray Shiv Sena Will Contest Local Body Polls Alone Sanjay Raut
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, विरोधकांची टीका
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला

हेही वाचा >>>कारंजामध्ये मतदारांचे पाठबळ कुणाला?; कार्यकर्ते सतरंज्या उचलण्यासाठीच मर्यादित

महाविकास आघाडीकडून सुरवातीला काँग्रेसने हा मतदारसंघ मिळावा अशी मागणी केली होती. मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देण्यात आला. पण त्यांच्याकडे उमेदवारच उपलब्ध नव्हता. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या दक्षिण रायगडच्या जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना पक्षात घेऊन परस्पर उमेदवारी जाहीर केली. हीबाब समोर येताच शिवसेनेच्या ठाकरे गटाने अनिल नवगणे यांची पक्षातून हकालपट्टी केली. दुसरीकडे काँग्रेस मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर असलेल्य़ा राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यांनतर काँग्रेसच्या तालुका संघटनांनी राजेंद्र ठाकूर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या सभेतही काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले नही. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनीही या सभेला जाणे टाळले. त्यामुळे अनेकांच्यां भुवया उंचावल्या. मविआतील घटक पक्षात असलेला हा विसंवाद महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. मतदारसंघात अल्पसंख्यांक समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मनसेने मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे.

हेही वाचा >>>पूर्व नागपूरच्या बालेकिल्ल्यात भाजपपुढे प्रथमच आव्हान

लोकसभा निवडणूकीत अल्पसंख्यांक मतेही महाविकास आघाडीकडे वळल्याचे दिसून आले होते. त्यामुळे मनसेचा अल्पसंख्याक उमेदवार निवडणूक रिंगणात असणे आदिती तटकरे यांच्या पथ्यावर पडणार आहे. अल्पसंख्यांकांची मते मत महाविकास आघाडीकडे जाण्यापासून रोखणे यामुळे शक्य होणार आहे. लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या सुनील तटकरे यांना या मतदारसंघातून २९ हजार ८७२ इतके मताधिक्य मिळाले होते. तटकरे यांना ८६ हजार ९०२ तर शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गीते यांना ५७ हजार ०३० मते मिळाली होती. त्यामुळे हे मताधिक्य कायम राखण्यात आदिती तटकरे यशस्वी ठरणार का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Story img Loader