Maharashtra Assembly Election MNS Result Updates : ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या एकूण १८ पैकी १२ जागांवर निवडणूक लढलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद पाटील आणि ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव हे विजयी होतील, हा मनसे नेत्यांचा दावा फोल ठरला असून या दोन्ही ठिकाणी मनसेचा पराभव झाला आहे. १२ पैकी ५ उमेदवारांना १० हजारांच्या आत तर, ४ उमेदवारांना २० हजारांच्या आत मते मिळाल्याने अनेक उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे. या निवडणूक निकालानंतर ठाणे जिल्ह्यात मनसेला उतरती कळा लागल्याची चर्चा रंगली आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदार संघ आहे. त्यापैकी १२ मतदार संघात मनसेने उमेदवार उभे केले होते. ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि भिवंडी महापालिकांमध्ये यापूर्वी मनसेचे नगरसेवक होते, मात्र गेल्या काही महापालिका निवडणुकीमध्ये मनसेचे पीछेहाट झाली. असे असले तरी पाच वर्षांपूर्वी झालेल्या म्हणजेच २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदार संघातून मनसेचे माजी आमदार प्रमोद पाटील हे निवडून आले होते. तर, ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव यांचा १९ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यामुळेच, यंदाच्या निवडणूकीत कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील हे विजयी होतील आणि त्याचबरोबर अविनाश जाधव हे सुद्धा विजयी होतील, असे दावे मनसे नेत्यांकडून करण्यात येत होते.

शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा विखे-पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : शिर्डीतल्या एकाच इमारतीत ७ हजार मतदार वाढले? काँग्रेसच्या आरोपात किती तथ्य?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Delhi assembly elections 2025 news in marathi
दिल्ली’साठी आज मतदान; तिरंगी सामन्यात मतटक्क्यावर सत्तेचे गणित
काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देणारे ८ आमदार कोण? त्यांनी भाजपात प्रवेश का केला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 

राज्यातील ज्या जागांवर उमेदवारांचा विजय होऊ शकतो, अशा ठिकाणी सभा घेणार असल्याचे सांगत मनसे प्रमूख राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहर मतदार संघात प्रत्येकी दोन जाहीर सभा घेतल्या होत्या. ठाण्यात शर्मिला ठाकरे यांनी चौक सभा घेतल्या होत्या. एकूणच प्रचारातील वातावरण निर्मितीमुळे मनसेची प्रचारात हवा दिसून येत होती. प्रत्यक्ष निकालात दोन्ही जागांवर मनसेचा पराभव झाला आहे. तर उर्वरित १० जागांवर मनसेचा दारुण पराभव झाला असून अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. जिल्ह्यात मनसेला एकही जागा मिळू शकलेली नसून या निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात मनसेला उतरती कळा लागल्याची चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा… पालघर जिल्ह्यात प्रस्थापितांविरुद्ध कौल

मनसेचे कल्याण ग्रामीणमधील उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांना ७४ हजार ७६८ मते, तर ठाणे शहरमधील उमेदवार अविनाश जाधव यांना ४२ हजार ५९२ मते मिळाली. कल्याण पश्चिममधील उमेदवार उल्हास भोईर यांना २२ हजार ११४ मते मिळाली. भिवंडी ग्रामीणमधील उमेदवार वनिता कथोरे यांना १३ हजार ८१६ मते, ओवळा माजीवडामधील उमदेवार संदीप पाचंगे यांना १३ हजार ५५२ मते, कळवा मुंब्रामधील उमेदवार सुशांत सूर्यराव यांना १३ हजार ९१४ मते, बेलापूरमधील उमेदवार गजानन काळे यांना १७ हजार ७०४ मते मिळाली. या चार उमेदवारांना २० हजारांचा पल्लाही गाठता आलेला नाही. शहापूरमधील उमेदवार हरिश्चंद्र खांडवी यांना ५ हजार ६४८ मते, भिवंडी पूर्वमधील उमेदवार मनोज गुळवी यांना १ हजार ३ मते, मुरबाडमधील उमदेवार संगीता चेंदवणकर यांना ७ हजार८९४ मते, मीरा-भाईंदरमधील उमेदवार संदीप राणे यांना ५ हजार २४३ मते, ऐरोलीमधील उमेदवार निलेश बाणखेले यांना ६ हजार ९०८ मते मिळाली. या पाच उमेदवारांना १० हजारांचा पल्लाही गाठता आलेला नाही.

Story img Loader