वर्धा : लोकसभा निवडणुकीतील योगदानाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत सहकार्य मिळावे म्हणून काँग्रेसने ‘भारत जोडो’ अभियानास साकडे घातले आहे.

‘भारत जोडो’ अभियान या चळवळीचे राष्ट्रीय अधिवेशन जुलैच्या पहिल्या आठवड्यात सेवाग्रामात संपन्न झाले होते. त्यावेळी अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्र, झारखंड व हरियाणा राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रिय राहण्याबाबत भाष्य केले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘भारत जोडो’ने इंडिया आघाडीस समर्थन दिले होते. आघाडीस मिळालेल्या यशात अभियानाचे योगदान स्पष्ट झाले. महाराष्ट्रात ३० व देशभरात १३६ मतदारसंघात अभियानाने योगदान दिले होते. त्यापैकी अनुक्रमे २० व ७४ लोकसभा मतदारसंघात ‘इंडिया’ आघाडीस विजय मिळाला, असा दावा सेवाग्रामच्या अधिवेशनात योगेंद्र यादव, तुषार गांधी, उल्का महाजन यांनी केला होता. आता आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत ‘भारत जोडाे’ अभियान सक्रिय राहणार असल्याचे सूतोवाच झाले.

Bapusaheb Pathare, Sharad Pawar group,
भाजपाचे नेते बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे दिले संकेत
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
BJP rashtriya seva Sangh Co ordinator Constituency Upcoming Assembly Election
निवडणुकीसाठी राज्यात संघ ‘दक्ष’; मुख्यमंत्रीपद भाजपला मिळविण्याचा निर्धार; प्रत्येक मतदारसंघात भाजप-संघ समन्वयक
president Draupadi Murmu, crimes against women, Kolkata doctor rape-murder, Alka Lamba, Congress criticism, Manipur violence, women’s empowerment,
माफ करा… राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूजी…काँग्रेसच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष असे का म्हणाल्या ?…
maharashtra government ignore movement by union related to Rashtriya Swayamsevak Sangh
संघाशी संबंधित संघटनेच्या आंदोलनाकडे सरकारची पाठ.. नागपुरात उपोषण…
Appa Shinde Kalyan East area Kalsevadi drug shop stolen by thieves
कल्याणमध्ये माजी आमदाराच्या औषध विक्री दुकानात चोरी
loksatta analysis national conference congress alliance have victory chances in assembly polls
विश्लेषण : जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसला संधी, मात्र जागावाटपात कसोटी!
Badlapur incident, congress protest in nagpur, congress alleges bjp over badlapur case, badlapur school case, Badlapur sexual abuse Case child torture, Maharashtra, Congress,
“बदलापूरमधील ती शाळा भाजपा आणि संघाशी संबंधित,” काँग्रेसचा आरोप…

हेही वाचा – सध्याची लोकसभा सर्वांत वयोवृद्ध! तरुण खासदारांची संख्या का घटली?

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येत्या गुरुवारी मुंबईत इस्लाम जिमखाना या ठिकाणी जनसंघटनांसोबत बैठक आयोजित केली आहे. लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला संवाद पुढे नेण्यासाठी ही संवाद बैठक आयोजिण्यात आली असल्याचे प्रदेश काँग्रेसने आपल्या निमंत्रणात नमूद केले आहे. ‘भारत जोडो’ अभियानात जुळलेल्या संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित राहणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात ‘इंडिया’ आघाडीसोबत या संघटना ताकदीने उभ्या राहिल्याने अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल या संघटनांचे काँग्रेसने आभार मानत बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे.

या बैठकीत प्रामुख्याने लोकसभेतील कामकाजाचा आढावा, संघटनांचा सहभाग व राजकीय पक्षांसोबतचा संवाद हे मुद्दे राहतील. तसेच या संघटनांची काँग्रेस पक्षाकडून असणारी अपेक्षा, पक्षाच्या जाहीरनाम्यात घ्यावयाचे अपेक्षित मुद्दे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती व कार्यक्रमाची आखणी यावर संवाद होणार आहे. राज्यातील सर्व जनसंघटनांचे किमान दोन प्रतिनिधी बैठकीत सहभागी राहतील.

हेही वाचा – धुळ्यात भाजपचे वरातीमागून घोडे

अभियानाचे प्रमुख नेते अविनाश काकडे म्हणाले की, संवाद बैठकीचे निमंत्रण मिळाले असून वरिष्ठ नेत्यांशी बोलणे झाले आहे. मात्र, ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दोन दिवस कार्यक्रम असल्याने बैठकीत सहभागी होणे शक्य नसल्याचे कळवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील अभियानाच्या भूमिकेबाबत पारदर्शी चर्चा सुरूच राहणार. ‘भारत जोडो’ अभियानाने महाविकास आघाडीचे समर्थन करण्याची भूमिका स्वीकारली असली तरी प्रस्तुत होणाऱ्या जनतेच्या जाहीरनाम्याला पाठिंबा देण्याची अट आघाडीतील राजकीय पक्षांपुढे ठेवली आहे.