मुंबई : महाराष्ट्र थेट विदेशी गुंतवणुकीत देशात पुन्हा अव्वल ठरला आहे. राज्यातील विदेशी गुंतवणुकीच्या वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यांमध्ये झाली आहे. महाराष्ट्र हा देशात अग्रेसर असून आता तो थांबणार नाही, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

देशातील परकीय गुंतवणुकीची

२०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबरपर्यंतच्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या ४ वर्षांमध्ये सरासरी एक लाख १९ हजार ५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त ६ महिन्यात आली आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.औद्योगिक आघाडीवरील राज्याची घोडदौड पुढेही कायम राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

Interest rate cut RBI impact on home loan EMI
रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षेप्रमाणे व्याजदर कपात… पण गृहकर्जाच्या ‘ईएमआय’मध्ये यातून किती फरक पडेल?
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Most indebted farmers Punjab, Maharashtra
महाराष्ट्र नव्हे पंजाबात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दावा
Increase in foreign direct investment in insurance sector in the budget
कीमत जो तुम चाहो
Encouraging private sector investment
खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन
Companies urged to pay better salaries 53 percent of highly educated graduates protest
चांगले वेतन देण्याचे कंपन्यांना आर्जव; उच्चशिक्षित ५३ टक्के पदवीधरांची बोळवण
Economic Survey Report predicts possible growth rate of 6 8 percent
६.८ टक्क्यांचा विकासवेग शक्य
Need for economic reforms Recommendation to create 8 million jobs annually
आर्थिक सुधारणांची गरज! सर्वंकष नियमन सुधारणा, वार्षिक ८० लाख रोजगार निर्मितीची शिफारस

हेही वाचा…Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचा ‘पीडीए’ फॉर्म्युला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत चालणार का? ‘सपा’ने सुरु केली मोठी मोहीम

राज्यातील विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी :

२०२०-२१ : १,१९,७३४ कोटी

२०२१-२२ : १,१४,९६४ कोटी

२०२२-२३ : १,१८,४२२ कोटी

२०२३-२४ : १,२५,१०१ कोटी

२०२४-२५ (एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात) : १,१३,२३६ कोटी

Story img Loader