Maharashtra Politics Mahayuti vs Maha vikas aghadi : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. महायुतीने २८८ पैकी तब्बल २३० जागा जिंकत बहुमतात सत्तास्थापन केली. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त ४८ जागाच जिंकता आल्या. या पराभवानंतर ‘मविआ’ नेत्यांनी थेट ईव्हीएमवर शंका घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणुकीत विविध पक्षांना मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये तफावत असल्याचं अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी काय म्हटले?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की, “निवडणुकीत आमच्या पक्षाला एकूण ७२ लाख मते मिळाली असली तरी केवळ १० जागाच जिंकता आल्या. दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला ५८ लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (उबाठा) सुमारे ८० लाख मते मिळवली आणि २० जागा जिंकल्या, तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसच्या बाबतीतही तसंच घडलं आहे. ईव्हीएमवर आमची शंका नाही, कारण त्यासंबंधीचे ठोस असे पुरावे माझ्या हातात नाहीत. मात्र, मतदानाच्या आकडेवारीवरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.”

ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?
Delhi Elections 2025
Delhi Elections 2025 : भाजपाला २६ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची तर काँग्रेसला चमत्काराची आशा; दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’समोर सत्तेत आल्यापासून सर्वात मोठे आव्हान
भाजपाला दिल्ली दूरच... आपने दशकभर वर्चस्व कसं राखलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाला दिल्ली दूरच… ‘आप’ने दशकभर वर्चस्व कसं राखलं?
Pyari Didi Yojana
Delhi Elections : भाजपा-सेनेच्या ‘लाडकी बहिण’च्या अभूतपूर्व यशानंतर काँग्रेसची दिल्लीत ‘प्यारी बहन’ला साद

हेही वाचा : Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार निवडणूक निकालांसह शरद पवारांच्या छायेतून कसे बाहेर पडले? 

शरद पवारांच्या प्रश्नांना फडणवीसांचं उत्तर

दरम्यान, शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये फडणवीस म्हणाले, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला १,४९,१३,९१४ मिळूनही फक्त ९ जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसला ९६,४१,८५६ मते मिळवून तब्बल १३ जागा जिंकल्या. शिवसेना (ठाकरे गट) ७३,७७,६७४ मते मिळवूनही ७ जागा जिंकता आल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) ५८,५१,१६६ मते मिळाली आणि त्यांनी ८ जागा जिंकल्या.” यावेळी फडणवीसांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीचाही दाखला दिला. “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ८७,९२,२३७ मते मिळूनही फक्त एकच जागा जिंकता आली होती. तर एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ८३,८७,३६३ मते मिळाली आणि तरीही त्यांनी ४ जागा जिंकल्या होत्या.”

लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी काय सांगते?

२०१४ आणि २०१९ मध्ये आलेल्या मोदी लाटेमुळे महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांच्या सरासरी फरकात लक्षणीय वाढ झाली होती. केवळ भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांचे उमेदवार देखील मोठ्या फरकाने विजयी झाले होते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत असं घडलं नाही. महाराष्ट्रात भाजपाविरोधी मते एकत्र आल्याने महायुतीला मोठा फटका बसला. परिणामी महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार कमी अत्यंत फरकाने विजयी झाले. उदाहरण द्यायचे झाल्यास, मोदी लाटेत उमेदवारांचा विजयाच्या फरक सरासरी १.८७ लाख मते इतका होता. २०२४ मध्ये हाच फरक १ लाख ९ हजारांवर आला. याआधी २००९ मध्ये उमेदवारांच्या विजयाचा फरक सरासरी ७७ ,८९८ मते होता.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २८ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी केवळ ९ जागांवरच त्यांना विजय मिळवता आला. या सर्व उमेदवारांच्या सरासरी विजयाचा फरक १.६० लाख मते इतका होता. सगळ्यात मोठा विजय पीयूष गोएल यांनी नोंदवला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांनी ३.५७ लाख मताधिक्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. भाजपाकडून सर्वात कमी मताधिक्याने उदयनराजे भोसले विजयी झाले. त्यांना ‘मविआ’ उमेदवारापेक्षा फक्त ३२,७७१ मते जास्त मिळाली.

भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटानेही चांगली कामगिरी केली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे तब्बल २ लाख ९ हजार मताधिक्याने विजयी झाले. तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रविंद्र वायकर हे सर्वात कमी (४८ मते) मताधिक्याने विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाने १५ जागा लढवल्या होत्या. यापैकी ७ जागा जिंकण्यात त्यांना यश मिळालं. भाजपाचा दुसरा मित्रपक्ष अजित पवार गटाला ४ पैकी फक्त एकच जागा जिंकता आली. त्यांच्या उमेदवाराच्या विजयाचा फरक जवळपास ८५ हजार इतका होता.

हेही वाचा : Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पुढे

दुसरीकडे, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत १७ पैकी १३ जागा जिंकत जोरदार पुनरागमन केलं. त्यांचे उमेदवार सरासरी ९० हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराने तब्बल २ लाख ६० हजार मताधिक्याने विजय मिळवला. तर धुळे मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला फक्त ३ हजार ८३१ मतांनी विजय मिळवता आला. शिवसेना ठाकरे गटाने २१ पैकी ९ जागा जिंकत प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उमेदवारांच्या विजयाचे सरासरी फरक १ लाख १२ हजार मते इतका होता. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार तब्बल २ लाख २९ हजार मताधिक्याने विजयी झाले. तर मुंबई उत्तर पूर्वमध्ये सर्वात कमी म्हणजे २९ हजार ८६१ मतांनी ठाकरे गटाचा विजय झाला.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक स्ट्राइक रेटने १० पैकी ८ जागा जिंकल्या. त्यांच्या उमेदवारांच्या विजयाचा सरासरी फरक ८९ हजार ५७१ होता. काँग्रेसच्या आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या विजयाचे सरासरी अंतर जवळपास सारखेच होते. सर्वात मोठा विजय हा सुप्रिया सुळे यांनी नोंदवला. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचा तब्बल १ लाख ५८ हजार मताधिक्यांनी पराभव केला. तर सर्वात कमी विजयाचा फरक हा बजरंग सोनावणे यांचा होता. त्यांनी पंकजा मुंडे यांना फक्त ६ हजार ५५३ मतांनी पराभूत केले. दरम्यान, लोकसभेत महायुतीला अपयश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत दोन्ही आघाड्यांमधील मतांची आकडेवारी स्पष्ट केली होती.

विधानसभा निवडणुकांबाबत आकडेवारी काय सांगते?

लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन करत २८८ पैकी २३० जागा जिंकल्या. महायुतीचे तब्बल १५ उमेदवार १ लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. यामध्ये भाजपाचे ८, अजित पवार गटाचे ४ आणि शिवसेना शिंदे गटाच्या ३ उमेदवारांचा समावेश आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला एवढा मोठा विजय मिळवता आला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये महाराष्ट्रात फक्त ४ उमेदवारांनाच १ लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवता आला होता. यंदा सर्वात कमी फरकाने (१००० पेक्षा कमी) ४ उमेदवार विजयी झाले. यापैकी दोन जागा महायुतीने जिंकल्या, तर एका जागेवर महाविकास आघाडीचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपाच्या १३२ उमेदवारांच्या सरासरी विजयाचे अंतर ३४ हजार ९४३ ,९४३ मते इतके झाले. २०१९ मध्ये हेच अंतर २९ हजार मताधिक्यांच्या आसपास होते. तर २०१४ मध्ये भाजपा उमेदवारांना सरासरी २३ हजार मताधिक्याने विजय मिळाला होता.

महाविकास आघाडीची कामगिरी लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने ८६ पैकी १० जागा जिंकल्या. त्यांच्या उमेदवारांच्या सरासरी विजयाचे अंतर २३ हजार ८२३ मते इतके आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला ९४ जागांपैकी २० जागांवर विजय मिळवता आला. त्यांच्या सरासरी विजयाचे अंतर १३ हजार ८७२ मताधिक्य आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक १०१ जागा लढवणाऱ्या काँग्रेसला फक्त १६ जागांवरच विजय मिळाला. त्यांच्या सरासरी विजयाचे अंतर १२ हजार ६६४ मते असल्याचं समोर आलं आहे. शरद पवार यांच्या पक्षाने निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा १४ लाख जास्त मताधिक्य मिळवलं ही वस्तुस्थिती असली तरी त्यांनी २७ जागा जास्त लढवल्या होत्या. दरम्यान, शरद पवार यांनी केलेला दुसरा युक्तिवाद असा आहे की, शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा ३७ जागा जास्त जिंकल्या. यामध्ये दोन फॅक्टर महत्वाचे ठरले. ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा ९ जागा जास्त लढवल्या. तर शिवसेना शिंदे गटाला त्यांच्या मतदारसंघात जवळपास अडीज पट मताधिक्याने विजय मिळाला.

हेही वाचा : अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?

२०२४ लोकसभा निवडणुकीत विजयाचा फरक

महायुती

भाजप : ९ जागा, सरासरी १.६० लाख मताधिक्याने विजयी

शिवसेना : ७ जागा, सरासरी १ लाख मताधिक्याने विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस : १ जागा, सरासरी ८२, ७८४ लाख मताधिक्याने विजयी

महाविकास आघाडी

काँग्रेस : ​​१३ जागा, सरासरी ९०,४३२ लाख मताधिक्याने विजयी

शिवसेना (उबाठा) : ९ जागा, सरासरी १.१२ लाख मताधिक्याने विजयी

राष्ट्रवादी (शरद पवार गट ) : ८ जागा, सरासरी ८९.५७१ लाख मताधिक्याने विजयी

२०२४ विधानसभा निवडणुकीतील विजयी फरक

महायुती

भाजप : १३२ जागा, ४२,०८२ लाख मताधिक्याने विजयी

शिवसेना (शिंदे गट) : ५७ जागा, सरासरी ३२,४१२ लाख मताधिक्याने विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस : ४१ जागा, सरासरी ३९,०२५ लाख मताधिक्याने विजयी

महाविकास आघाडी

काँग्रेस : ​​१६ जागा, सरासरी १२,६७४ लाख मताधिक्याने विजयी

शिवसेना (उबाठा) : २० जागा, सरासरी १३,८७२ लाख मताधिक्याने विजयी

राष्ट्रवादी (शरद पवार गट) : १० जागा, सरासरी २३,८२३ लाख मताधिक्याने विजयी

Story img Loader