Mahayuti Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळविल्यानंतर राज्यात महायुतीने सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात आलं. मात्र, सरकारमधील मंत्री आमची कामं करीत नाहीत. आलिशान कारमधून ते खाली उतरत नाहीत, अशा तक्रारी भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्या. त्यांच्या या तक्रारींची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेतली आहे. सरकार व पक्षात समन्वय राहावा आणि कार्यकर्त्यांची कामं मार्गी लागावीत यासाठी भाजपानं १९ मंत्र्यांसाठी स्वीय सहायकांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपाचे कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे मंत्र्यांचे स्वीय सहायक असणार आहेत. दरम्यान, स्वीय सहायकांबरोबर समन्वय ठेवण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते मंत्रालयातील भाजपा कार्यालयातून काम पाहणार आहेत. अलीकडेच सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, महाराष्ट्रातील मंत्र्यांना तीन विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.

forest minister ganesh naik made statement saying if necessarywe will hold meeting of officials to resolve hurdles in city
वनमंत्री गणेश नाईक म्हणतात, ठाणे सर्वांचेच…गरज पडली तर बैठक घेऊ…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Central Civil Services information in marathi
मुलाखतीच्या मुलखात : केंद्रीय सेवा
Eknath Shindes statement said beloved brother is bigger than post of Chief Minister or Deputy Chief Minister
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापेक्षा लाडका भाऊ मोठा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान
Municipal administration unhappy with District Collector honoured by President after Municipal contribute for assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी पालिकेची यंत्रणा, राष्ट्रपतीकडून सन्मान मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा; पालिका प्रशासन नाराज
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी
mumbai Chief Ministers Assistance Fund Cell will be set up in each district s Collector s Office
जिल्हाधिकारी कार्यालयातही आता ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’

आणखी वाचा : Maharashtra Politics : उदय सामंत हे एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकतात का?

त्याशिवाय तीन वैयक्तिक सहायक नियुक्त करण्याचा अधिकारही मंत्र्यांना देण्यात आला आहे. यामधील दोन सहायक हे सरकारी कर्मचारी असणे बंधनकारक नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरकारमध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सरकारी वेतन मिळणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “सुधीर देऊळगावकर हे पक्षातील मंत्री आणि कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणून काम करतील. भाजपा कार्यकर्त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.” दरम्यान, सरकार आणि पक्षामधील दुरावा कमी करण्यासाठी महाराष्ट्रात अशा प्रकारची संरचित यंत्रणा राबविण्याचा हा पहिलाच निर्णय आहे. मागील महायुती सरकार हे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील होते, ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते.

मंत्र्यांसाठी स्वीय सहायकांची नेमणूक का करण्यात आली?

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर देऊळगावकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “सरकार आणि पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आली आहे. जेव्हा भाजपामधील कोणताही सदस्य नागरिकांचे प्रश्न किंवा समस्या मांडण्यासाठी आमच्याकडे येईल, तेव्हा संबंधित मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल.” सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपातील अनेक पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांना आपापल्या समस्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवणे कठीण जात होते. राज्यात भाजपाची सत्ता आणि मंत्री असूनही आपली कामे पूर्ण होत नाहीत, अशी सार्वजनिक तक्रार कार्यकर्त्यांनी केली होती.

महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या कामांबाबतही कार्यकर्त्यांनी नाराजी बोलून दाखवली. निवडणुकीच्या वेळी पक्षाला कार्यकर्ते आठवतात आणि आदेश काढून कामाला जुंपतात. मात्र, सत्ता आल्यानंतर कोणीही आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही, अशी भावनाही भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळेच सरकार व पक्षात समन्वय राहावा आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शासनदरबारी असलेली कामे मार्गी लागावीत याकरिता मंत्र्यांसाठी स्वीय सहायकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं २८८ पैकी २३० जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. प्रतिकूल परिस्थिती असतानाही एकट्या भाजपानं तब्बल १३२ जागांवर विजय मिळवला. महायुती आणि भाजपाच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोलाचा वाटा असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे संघाच्या मुशीतून घडलेल्या मंत्र्यांबरोबर कार्यकर्त्यांचा समन्वय राहावा यासाठी भाजपानं आपल्या मंत्र्यांसाठी स्वीय सहायक नेमण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, स्वीय सहायकांची नेमणूक करण्याचा निर्णय फक्त भाजपाच्या १९ मंत्र्यांपुरताच मर्यादित आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री त्यांच्या पसंतीच्या व्यक्तींची स्वीय सहायकपदी नेमणूक करू शकतात. जर भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्द्यांशी संबंधित कामे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी निगडित असतील, तर भाजपाचे मंत्री त्या मुद्द्यांचा पाठपुरावा करतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : Ram Mandir Ayodhya : राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्येतल्या लोकांचं आयुष्य कसं बदललं?

स्वीय सहायकांच्या नेमणुकीमुळे काय होईल?

भाजपाचे एक वरिष्ठ नेते म्हणाले, “स्वीय सहायकांच्या नियुक्त्यांमुळे पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांचे प्रश्न अगदी सहजपणे मांडता येतील. म्हणूनच ज्या व्यक्तींची मंत्र्यांच्या स्वीय सहायकपदी नियुक्ती केली जाईल, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे कार्यकर्ते असतील.” कोणताही छुपा अजेंडा राबविण्याचा हा प्रयत्न नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं सांगितलं, “जेव्हा एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचे प्रश्न मंत्र्यांपर्यंत अगदी सहजपणे मांडता येत होते. त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या मनावर शिंदेंच्या नेतृत्वानं छाप पाडली. दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांना कायम मंत्रालयापासून दूर राहा, असं सांगितलं जात होतं. त्यामुळे त्यांना आपले प्रश्न मंत्र्यांसमोर मांडता आले नाहीत. परिणामी अनेक कार्यकर्त्यांचा असा समज झाला की, आपली उपयुक्तता केवळ निवडणुकीपर्यंतच आहे.”

आतापर्यंत किती मंत्र्यांना मिळाली परवानगी?

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर काही कठोर निर्णय घेतले आहेत. महायुती सरकारमधील मंत्र्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी वाट पाहावी लागत आहे. आतापर्यंत ४१ मंत्र्यांपैकी (मुख्यमंत्र्यांशिवाय) फक्त २३ मंत्र्यांनाच त्यांच्या स्वीय सहायकांची नेमणूक करण्याची परवानगी मिळाली आहे. दरम्यान, भाजपाचा हा निर्णय कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यात आणि पक्षात समन्वय राखण्यात कितपत यशस्वी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader