भंडारा : पूर्व विदर्भाच्या टोकावरील भंडारा जिल्ह्याची दुर्दैवाने मागासलेला जिल्हा, अशी ओळख अजूनही पुसली गेलेली नाही. सर्वार्थाने प्रचंड क्षमता असतानाही येथील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा जिल्हा आजही आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच आहे. असे असताना येथील आमदार मात्र कोट्यधीश झाले आहेत. पाच वर्षांत आमदारांच्या संपत्तीत झालेली वाढ डोळे विस्फारणारीच आहे.

भंडारा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास खुंटलेला असताना येथील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांत अडीचपटीने वाढ झाली असून त्यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर यांच्या संपत्तीत त्यांच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. भोंडेकर दाम्पत्याकडे आठ कोटी दोन लाख ४३ हजार ९१ रुपये एवढी जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. २०१९ च्या तुलनेत भोंडेकर यांच्या संपत्तीत अडीच पटीने वाढ झाली आहे. २०१९ मध्ये भोंडेकर यांच्याकडे १ कोटी १ लाख १७ हजार ९३० रुपयांची मालमत्ता होती, ती आता २ कोटी ५८ लाख ३ हजार ९०६ रुपयांवर पोहोचली आहे. त्याच्याकडे जमीन, विमा, वाहन, ६४ हजार रुपये किंमतीची बंदूक आहे. भोंडेकर यांच्यावर अंदाजे १ कोटी ३२ लाख १५ हजार ९२८ रुपयांचे कर्ज आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अश्विनी नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे आमदारपतीपेक्षा दुप्पट मालमत्ता आहे. डॉ. अश्विनी यांच्याकडे ५ कोटी ४४ लाख ३९ हजार १८५ रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. १ कोटी १५ लाख रुपयांची मर्सिडीज लक्झरी मोटार आणि १० लाख रुपयांची टाटा सफारी एसयूव्ही आहे. त्यांच्यावर १ कोटी १६ लाख ८१ हजार ८८४ रुपयांचे कर्ज आहे.

Buldhana District, Malkapur, BJP, Congress, Chainsukh Sancheti,
मलकापूरमध्ये छुपी बंडखोरी, मतविभाजन कळीचा मुद्दा
9th december 2024 Marathi Daily Horoscope in marathi
९ डिसेंबर पंचांग; दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींचा…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

साकोली विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. आमदार नाना पटोले यांना शेतकऱ्यांचे नेते म्हटल्या जाते, मात्र आजही साकोली मतदारसंघातील शेतकरी मुबलक पाणी, मोफत वीज, सिंचनाचा प्रश्न अशा अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. आमदार पटोले यांच्याकडे आजमितीस २ कोटी ४२ लाख ५५ हजार ४२७ एवढी संपत्ती असून त्यांच्या पत्नी मंगला पटोले यांच्याकडे ४ कोटी २१ लाख ८९ हजार २४४ एवढी स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. पटोले दांपत्याकडे एकूण ६ कोटी ६४ लाख ४४ हजार ६७१ एवढी संपत्ती असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे ही वाचा… महायुती, महाविकास आघाडीत ‘गॅरंटी’ची स्पर्धा

हे ही वाचा… Shirala Assembly Constituency : शिराळ्यात जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक

तुमसर विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांच्याकडे ३५ कोटी ३९ लाख ९८ हजार ४२४, तर त्यांच्या पत्नीकडे १० कोटी ९ लाख ६४ हजार ३९१ एवढी संपत्ती आहे. कारेमोरे दाम्पत्याकडे ४५ कोटी ४९ लाख ६२ हजार ८१५ एवढी मालमत्ता आहे.

Story img Loader