नांदेड : Naigaon Assembly Election 2024 माजी खासदार भास्करराव खतगावकर आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत संभाजी पवार या जुन्या भागीदारांचे राजकीय वारस नायगाव विधानसभा मतदारसंघात परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी लढत भोकर मतदारसंघात असली, तरी नायगावमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार राजेश संभाजी पवार यांच्याविरुद्ध खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे येथील राजकीय सामना लक्षवेधी होणार आहे.

राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार आणि मीनल पाटील यांचे राजकीय पदार्पण २०१७ मध्ये नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वातून झाले. त्यानंतर मीनल यांना विधानसभेसाठी पहिल्यांदाच संधी मिळाली असून त्यांनी पवार यांना आव्हान देण्याची तयारी दोन महिन्यांपूर्वी सुरू केली होती. या दरम्यान त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न केला आहे.

congress observers mla ram mohan reddy
Hingoli Assembly Constituency : काँग्रेसच्या निरीक्षकांना भेटण्यास माजी आमदार गोरेगावकरांचा नकार, लढवण्यावर ठाम
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Anil Deshmukh : काटोलमध्ये सलीलविरुद्ध अर्ज दाखल करणारे ‘अनिल देशमुख’ कोण आहेत ?
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
ECI on Hitendra Thakur Party Symbol Whistle in Marathi
Hitendra Thakur Party Symbol : हितेंद्र ठाकूर यांची ‘शिट्टी’ गायब !
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा >>> Hitendra Thakur Party Symbol : हितेंद्र ठाकूर यांची ‘शिट्टी’ गायब !

राजेश यांचे वडील संभाजी पवार यांचे प्रस्थ १९८० च्या दशकात वाढले. पूर्वी ते सर्वसाधारण कंत्राटदार होते. नंतर ते शंकररावांचे थोरले जामात असलेल्या खतगावकर यांचे व्यावसायिक भागीदार झाले. नव्वदच्या नंतर त्यांची मोठी भरभराट झाली. त्याच्या बळावरच पवार मग भाजपामध्ये गेले. तेथे त्यांना गोपीनाथ मुंडेंचे पाठबळ लाभले.

भास्करराव खतगावकर आणि संभाजी पवार यांच्यात २००९ साली लोकसभेसाठी थेट लढत झाली होती. या लढतीत खतगावकर यांचा मोठ्या फरकाने विजय झाला होता. भाजपात दीर्घकाळ राहूनही पवार यांना आमदार-खासदार होता आले नाही, पण त्यांचे हे स्वप्न मुलाने २०१९ मध्ये साकारले.

नायगाव तालुक्याचे रहिवासी असलेल्या राजेश पवार यांच्या उमेदवारीला पक्षातील एका समूहाचा प्रखर विरोध होता, पण नेत्यांनी त्यांना पुन्हा संधी दिल्यानंतर नायगावलाच स्थायिक असलेल्या शिवराज होटाळकर यांनी त्यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण फडकविले असून दुसर्या बाजूला पवार यांना काँग्रेसच्या डॉ. मीनल यांच्या सशक्त आव्हानालाही तोंड द्यायचे आहे.

हेही वाचा >>> शिंदेंचा पाईक मिलिंद नार्वेकरांच्या भेटीला

जिल्ह्यात यापूर्वी वेगवेगळ्या नेत्यांच्या राजकीय वारसदारांत लढती झाल्या. अशोक चव्हाण विरुद्ध डॉ. किन्हाळकर, चव्हाण विरुद्ध गोरठेकर इत्यादी लढतीत काँग्रेसची सरशी झाली होती. आता पूर्वीच्या भागीदारांचे राजकीय वारस लढतीत उतरले आहेत.

आमदार झाले तेव्हा त्यांचे वार्षिक उत्पन्न ..

भाजपा उमेदवार राजेश पवार २०१९ साली आमदार झाले तेव्हा त्यांचे वार्षिक उत्पन्न ७८ लाख १५ हजार होते. तर त्यांचे मागील वर्षांतील वार्षिक उत्पन्न ५९ लाख दर्शविण्यात आले आहे. त्यांची चल-अचल मालमत्ता मात्र प्रचंड असून या दोन्ही मालमत्तांचे मूल्य सुमारे पावणे दोनशे कोटी रुपये आहे. शेती आणि व्यापार हा त्यांचा व्यवसाय आहे.

मीनल यांच्याकडे ८५ लाखांची चल तर ७१ लाखांची अचल संपत्ती

माहेर आणि सासरचा राजकीय वारसा लाभलेल्या डॉ. मीनल पाटील यांचे २०२३-२४ मधील वार्षिक उत्पन्न केवळ ३ लाख ८१ हजार इतके होते. त्यांचे पती निरंजन भास्करराव पाटील हे व्यावसायिक असून त्यांचे मागील वर्षाचे उत्पन्न २८ लाख ८१ हजार होते. मीनल यांच्याकडे ८५ लाखांची चल तर ७१ लाखांची अचल संपत्ती आहे. त्यांच्यावर बँकांचे ३१ लाखांचे कर्ज आहे.