नागपूर: राज्यातील २८ ते ३० विधानसभा मतदारसंघात हलबा समाजाचे मतदान मोठ्या संख्येने आहे. परंतु, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षाकडून समाजाला उमेदवारी न दिल्याने नाराजी आहे. त्यामुळे समाजाच्या विविध संघटना व सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी बैठक झाली. त्यात नागपूरच्या तीन विधानसभा मतदारसंघातील हलबा उमेदवारांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.  इतर सर्व हलबा अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या शपथाही यावेळी देण्यात आल्या. हलबा समाजाच्या एकीमुळे त्यांच्या मतांचा कुठल्या पक्षाला फटका बसणार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.

यंदा हलबा समाजाचा उमेदवार न दिल्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधात मतदान करू, असा इशारा हलबा समाजाकडून देण्यात आला होता. यंदा मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ॲड. नंदा पराते आणि रमेश पुणेकर यांनी उमेदवारी मागितली होती. तर भाजपकडूनही विद्यमान आमदार विकास कुंभारे, दीपक देवघरे, दीपराज पार्डीकर यांचे नाव चर्चेत होते. परंतु काँग्रेसने बंटी शेळके यांना तर भाजपने प्रविण दटके यांना उमेदवारी जाहीर केली. समाजाला प्रतिनिधीत्व न मिळाल्याने समाजाने तिव्र नाराजी व्यक्त करत मागील आठवड्यात बैठक घेतली.

Manoj Jarange Patil Maharashtra Assembly Election 2024
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंकडून काल मतदारसंघांची घोषणा, आज निवडणुकीतून माघार, आंतरवालीत रात्री काय घडलं?
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा >>> Rebellion In Amravati District :अमरावती जिल्‍ह्यात पाच ठिकाणी बंडखोरी अटळ

यावेळी हलबाबहुल मतदारसंघ असल्याने मध्य नागपूर लढायचे आणि जिंकूनही आणायचे असा निश्चय करण्यात आला. तर इतर मतदारसंघात समाजाला उमेदवारी नकारणाऱ्या एकाही पक्षाला मतदान न करता नोटाचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रविवारी जुनी मंगळवारी येथील कोलबा स्वामी समाज भवनात हलबा समाजाची बैठक झाली. यावेळी समाजातील पाच अराजकीय प्रतिनिधी नेमण्यात आले. त्यांनी समाजाला प्रतिनिधीत्व न दिल्यामुळे नाराजी व्यक्त करत हलबा समाजाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?

उमेदवारांशी चर्चा करत सर्वाधिक हलबा मतदारांची संख्या असलेल्या मध्य नागपूर विधानसभेमधून रमेश पुणेकर यांच्या नावावर एकमत करण्यात आले आहे. या मतदारसंघातील अन्य ११ हलबा उमेदवार सोमवारी अर्ज मागे घेणार आहेत. याशिवाय दक्षिण नागपूरमधून धनंजय धापोडकर तर पूर्वमधून मुकेश मासुरकर यांच्या उमेदवारीवर एकमत करण्यात आले. या बैठकीला भाजप आणि काँग्रेस पक्षातील हलबा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

विकास कुंभारेंना भाजपकडून डच्चू

राज्याच्या विधानसभेत विद्यमान आमदार विकास कुंभारे हे हलबा समाजचे एकमेव प्रतिनिधी आहेत. २०१९ मध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपने कुंभारे यांना उमदवारी दिली होती व ते विजयी झाले होते. मात्र, यंदा भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली.

Story img Loader