अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक लक्षवेधी लढत होत आहे. भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठाण व वंचित पुरस्कृत अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांच्यात अटीतटीचा सामना आहे. या मतदारसंघात जातीयऐवजी धार्मिक राजकारणाचा ज्वर चढल्याचे चित्र असून मतविभाजन निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

अकोला पश्चिम मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सलग सहा निवडणुकांमध्ये दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी विजय मिळवला. त्यांच्या पश्चात भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना संधी दिली. वर्चस्व कायम राखण्यासाठी आता भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. ‘अकोला पश्चिम’मध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा घेऊन भाजपने वातावरण निर्मिती केली. ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारे देत हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्याचे पक्षाचे पुरेपूर प्रयत्न आहेत. भाजपतील संघटनात्मक यंत्रणेला कामाला लावून मतदान वाढीवर देखील जोर दिला. काँग्रेसकडून साजिद खान पठाण मैदानात आहेत. पक्षाने सलग तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास दाखवला. गेल्या निवडणुकीत काठावर साजिद खान पठाण यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या वेळेसच्या विधानसभेनंतर लोकसभेत देखील मतांचा टक्का वाढल्याने काँग्रेसचे मनोबल वाढले. मुस्लिमांच्या गठ्ठा मतांसह हिंदू मते मिळवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. मतविभाजनाचा धोका लक्षात घेता काँग्रेसने वंचितला रोखण्यासाठी मोठा डाव टाकला होता. साजिद खान यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचार सभांसह प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठका घेतल्या आहेत.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
inconsistencies in postal ballots and evm results in maharashtra question by shiv sena thackeray
टपाली मते, मतदान यंत्रांमधील मतांमध्ये तफावत कशी? शिवसेना ठाकरे गटाचा सवाल
bjp making strategy to end thakur rule from the vasai virar municipal corporation
‘ठाकूर’शाही संपवण्यासाठी दुबे प्रकरणाचा वापर; विधानसभेतील विजयानंतर आता पालिकेच्या नियंत्रणासाठी भाजपची व्यूहरचना
Assembly Elections 2024 BJP Division in Navi Mumbai due to Sandeep Naik rebellion print politics news
नवी मुंबईत भाजपच्या दोन संघटना? बेलापूरात पक्षाच्या जोर बैठका, ऐरोलीत नाईकांच्या आभार मेळावे
religious polarization in amravati municipal elections
महापालिकेच्‍या रणांगणातही धार्मिक ध्रुवीकरणाचे बाण? 
mva future amid maharashtra vishan sabha election 2024 results
Will MVA Fall Apart: मविआ फुटणार? दोन पक्षांमधून स्वतंत्र लढण्याची भूमिका, तिसऱ्याचं मौन! नेमकं काय घडतंय?
निवडणुकीतील पराभवानंतर भाजपामध्ये अंतर्गत कलह, थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी; पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स)
BJP Crisis : निवडणुकीतील पराभवानंतर भाजपामध्ये अंतर्गत कलह, थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी; पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय?

आणखी वाचा-जळगाव जामोदमध्ये भाजपची घोडदौड थांबणार?

माजी नगराध्यक्ष, अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना वंचित आघाडीच्या पाठिंब्याचे मोठे बळ मिळाले. वंचितच्या अधिकृत उमेदवाराने शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे पक्षाची कोंडी झाली होती. वंचितने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असती तर पक्षाचे सुमारे २५ हजारांचे गठ्ठा मतदान कुणाकडे वळणार, असा प्रश्न असता. वंचित आघाडीने उलट डाव टाकून आपले वजन अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांच्या पारड्यात टाकले. नाराज हिंदुत्ववादी मतांवर देखील आलिमचंदानींचे लक्ष राहील. भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठाण व अपक्ष हरीश आलिमचंदानी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अकोला महापालिकेत वेगवेगळ्या प्रभागांचे प्रतिनिधित्व केले. शहरातील प्रश्न व समस्यांची तिघांनाही जाण आहे. अकोला पश्चिममध्ये तिरंगी लढतीची चूरस निर्माण झाल्याचे दिसून येते.

आणखी वाचा-लक्षवेधी लढत : झिरवळ सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात

शेवटच्या टप्प्यात मोठा उलटफेर

अकोला पश्चिम मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात मोठा उलटफेर होण्याचा अंदाज आहे. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला. प्रहारकडून डॉ. अशोक ओळंबे व अपक्ष राजेश मिश्रा देखील निवडणूक लढत असल्याने मतविभाजनाचा अंदाज असून त्यांचे उपद्रव मूल्य किती या दृष्टीने प्रमुख उमेदवार चाचपणी करीत आहेत. शेवटच्या काही दिवसांमध्ये बदल होऊ शकतो.

Story img Loader