छत्रपती संभाजीनगर : आरक्षण मागणीच्या भूमीत महाविकास आघाडीस हादरा देत भारतीय जनता पक्षाने अग्रेसर राहत मराठाड्यातील ४६ पैकी ४० जागा महायुतीस मिळाल्या. महाविकास आघाडीस केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. भाजपची विजयाची कमान सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये चढी राहिली. २०१४ मध्ये भाजपला १५ जागा मिळाल्या होत्या. तेव्हापासून लढवलेल्या २० पैकी १९ जागांवर भाजपचा विजय झाला. आरक्षण आंदोलनात ‘भाजप’ ला पाडा हा नारा आता हवेत विरल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. लातूर शहरातून अर्चना पाटील चाकूर अटीतटीच्या लढतीमध्ये पराभूत झाल्या अन्यथा सर्व उमेदवार निवडून आले. महिला मतदारांचे शेकडा प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक असणाऱ्या २० जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील धनंजय मुंडे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, अतुल सावे हे सारे मंत्री विजयी झाले. यातील अब्दुल सत्तार, तानाजी सावंत व अतुल सावे या मंत्र्यांची विजयासाठी दमछाक झाली. धनंजय मुंडे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यापेक्षा तब्बल एक लाख ४० हजार अधिक मतांनी विजय मिळवला. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनीही मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. २०२९ मध्ये १० जागांवर असणाऱ्या काँग्रेसचे नेते अमित देशमुख हेही पहिल्या फेऱ्यांमध्ये मागे होते. मात्र, अंतिम निकाल त्यांच्या बाजूने लागला. एमआयएमच्या प्रवासाला पूर्णविराम नांदेडमधून सुरू झालेल्या एमआयएमच्या मराठवाड्यातील प्रवासाला या निवडणुकीमध्ये पूर्णविराम मिळाला. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पुन्हा एकदा नशीब आजमावले होते. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये ७० हजारहून अधिक मतांची आघाडी घेतल्यानंतर ते २१६१ मतांनी पराभूत झाले.

नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसने कायम राखली

भाजपने आघाडी घेतलेल्या नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत अखेरीस काँग्रेसचे रवींद्र चव्हाण हे १४५७ मतांनी विजयी झाले. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र यांना ५ लाख ८६ हजार तर भाजपचे संतूकराव हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार मते मिळाली.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
Loksatta lalkilla Congress BJP campaign AAP alleges corruption Sheila Dikshit
लालकिल्ला: काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम!
Are rebels in Legislative Assembly getting back to Shiv Sena shinde group again
विधानसभेतले बंडखोर पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर?
all-party feliciation Abdul Sattar chhatrapati sambhaji nagar
अब्दुल सत्तारांच्या सर्वपक्षीय सत्काराकडे महायुतीतील नेत्यांची पाठ
bjp limitation of work leadership loksatta news
कर्तृत्वमर्यादांमुळे भाजपचे पतन निश्चित!

हेही वाचा : महायुतीची ‘सत्ता’वापसी; लोकसभेत पराभूत झालेल्या १०५ जागांवर विजयी

साखरेच्या राजकारणातील काँग्रेसचे एकमेव नेते अमित देशमुख यांची भाजपच्या अर्चना चाकूरकर यांनी चांगलीच दमछाक केली. अमित देशमुख नऊ हजार मतांनी निवडून आले. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते असणाऱ्या लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांना रमेश कराड यांनी पराभूत केले. विधान परिषद सदस्य रमेश कराड यांना २०१९ मध्ये निवडणुकीमध्ये उतरायचे होते. पण तेव्हा उमदेवारी मिळाली नाही. धीरज देशमुख यांचा सात हजारांनी झालेला पराभव देशमुख कुटुंबीयांवरील ग्रामीण भागातील नाराजीमुळे असल्याचे सांगण्यात येत आहे. लातूरमधील साखरेच्या राजकारणाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. अमित देशमुख यांचीही मतदारसंघात चांगलीच दमछाक झाली. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये अमित देशमुख मागे पडले होते. संभाजीनगरमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष भुईसपाट विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष संभाजीनगर जिल्ह्यातून भुईसपाट झाला. कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत पराभूत झाले. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, विलास संदीपान भुमरे, प्रा. रमेश बोरनारे ही मंडळी निवडून आली. उदयसिंह राजपूत यांचा पराभव करून संजना जाधव निवडून आल्या. या निवडणुकीमुळे संभाजीनगरचा बालेकिल्ला शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा, असे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का; महाराष्ट्रात निराशा अन् झारखंडमध्येही पक्ष कमकुवत, कारण काय?

प्रमुख विजयी उमेदवार

●धनंजय मुंडे (परळी राष्ट्रवादी)

●श्रीजया चव्हाण (भोकर भाजप)

●सुरेश धस (आष्टी भाजप)

●अर्जुन खोतकर (जालना शिवसेना)

●कैलास पाटील (उस्मानाबाद शिवसेना-ठाकरे)

●विजयसिंह पंडित (गेवराई राष्ट्रवादी)

●राणाजगजितसिंह पाटील (तुळजापूर भाजप)

हेही वाचा : विधानसभेचे ७० लाख वाढीव मतदान

प्रमुख पराभूत उमेदवार

●इम्तियाज जलील (औरंगाबाद पूर्व एमआयएम)

●राजेश टोपे (धनसावंगी राष्ट्रवादी शरद पवार)

●राहुल मोटे (परांडा राष्ट्रवादी शरद पवार)

●सतीश चव्हाण (गंगापूर राष्ट्रवादी शरद पवार)

●लक्ष्मण पवार (गेवराई अपक्ष)

Story img Loader