अकोला : नेत्यांच्या वारसदारांना आमदारकीची डोहाळे लागले आहेत. कारंजा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांनी नेत्यांच्या वारसदारांनाच निवडणूक रिंगणात उतरवत कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्यासाठीच मर्यादित ठेवले. आता मतदार कुठल्या वारसदारांना मतांचे पाठबळ देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारंजामध्ये पंचरंगी लढतीचा अंदाज असून मतविभाजन व जातीय राजकारण देखील निर्णायक ठरणार आहे.

कारंजा मतदारसंघात प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी होती. मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. महायुतीमध्ये तडजोडीचे राजकारण झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सई डहाके यांनी पक्षांतर करून भाजपची उमेदवारी मिळवली, तर भाजपकडून इच्छूक असलेले दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पूत्र ज्ञायक पाटणी राष्ट्रवादीची तुतारी हातात घेत निवडणूक लढत आहेत. वंचित आघाडीने सुद्धा ऐनवेळी उमेदवार बदलून माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे पूत्र सुनील धाबेकर यांना संधी दिली. युसुफ पुंजानी एमआयएमवर, तर नाईक परिवारातील ययाती नाईक कारंजातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रमुख पाच उमेदवारांपैकी चार उमेदवार हे मोठ्या नेत्यांचे वारसदार आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडून वारसदारांनाच संधी दिल्याने सर्वच पक्षात अंतर्गत नाराजीचा सूर आहे. आता मतदार कुणावर विश्वास दाखवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

pune registry office
दुय्यम निबंधक कार्यालयांचा कायापालट, काय होती कारणे?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
election commission status to cooperative election authority
सहकार निवडणूक प्राधिकरणाला आयोगाचा दर्जा
Anjali Damanias allegations against Minister Dhananjay Munde are part of BJPs conspiracy says anil deshmukh
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका
upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
Maharashtra Govt To Appoint around 2 Lakh Special Executive Officers For Better Governance
पाचशे मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी; रहिवासी, ओळख प्रमाणपत्र देण्याचे अधिकार
Sanjay raut on all part mps meeting
खासदारांच्या बैठकीला मुहूर्तच मिळेना; नवीन खासदारांची एकही बैठक नाही

हेही वाचा >>>भाजपला आता रामाचा विसर, सुप्रिया सुळे यांचा ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात टोला

२०१९ मध्ये २२ हजार ७२४ मतांनी भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते प्रकाश डहाके यांचा पराभव केला होता. त्यावेळी शेवटच्या क्षणी राजेंद्र पाटणींनी माजी मंत्री बाबासाहेब धाबेकरांचा पाठिंबा मिळवला होता. आता समीकरणात व्यापक फेरबदल झाले आहेत. सुनील धाबेकर वंचितकडून स्वत: रिंगणात असल्याने भाजपकडे गेलेल्या घाटोळे पाटील समाजाच्या त्या गठ्ठा मतदानाला धक्का बसेल. नाईक घराण्यातील ययाती नाईक रिंगणात असल्याने बंजारा समाजाचे गठ्ठा मतपेढी देखील इतर उमेदवारांमध्ये विभाजित होण्याची शक्यता कमीच दिसून येते. युसुफ पुंजानी यांनी गेल्या वेळेस बसपाकडून लढत ४१ हजार ९०७ मते घेतली होती. यावेळेस ते किती मते घेतात, यावर इतर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहील. मराठा, कुणबी, दलित, मुस्लीम, बंजारा, माळी आदींसह विविध छोट्या-मोठ्या समाजाच्या गठ्ठा मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.

वाशीम जिल्ह्यात घराणेशाहीवर जोर

वाशीम जिल्ह्यात गवळी, झनक व देशमुख घराण्याचे मोठे प्रस्थ आहे. या तिन्ही परिवारातून रिसोड मतदारसंघात उमेदवार उभे आहेत. कारंजातून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई डहाके, दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पूत्र ज्ञायक पाटणी, धाबेकर कुटुंबातील सुनील धाबेकर व नाईक घराण्यातील ययाती नाईक हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. मतदार कोणत्या घराण्याला साथ देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Story img Loader