Mahavikas Aghadi : महाराष्ट्रात मुंबईसह जवळपास १४ महापालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. लवकरच या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील अशी शक्यता आहे. दरम्यान याआधीच महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या आणि उभे दावे पाहण्यास मिळत आहेत. महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल अशी स्थिती सध्या तरी दिसते आहे.

कुठून सुरु झाला वाद?

खासदार अमोल कोल्हे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना अजून झोपेतून जागी झालेली नाही, तसंच काँग्रेस मोडलेली पाठ अजून सरळ होत नाही हे वक्तव्य केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर याबाबत विजय वडेट्टीवार, संजय राऊत आणि नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्या. ज्यामुळे महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या पाहण्यास मिळत आहेत.

Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit
Dhananjay Munde : “…मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या मुद्यावर राऊतांचा थेट सवाल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sanjay Raut On Mumbai Municipal elections 2025
Sanjay Raut : महाविकास आघाडीत फूट? “काय होईल ते होईल, आम्ही सर्व महापालिका स्वबळावर लढवणार”, ठाकरे गटाची मोठी घोषणा
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Sanjay Raut on Mahavikas aghadi
Sanjay Raut : महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Maharashtra News : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करत आक्रोश मोर्चा, मनोज जरांगेही सहभागी

विजय वडेट्टीवार यांचं अमोल कोल्हेंना उत्तर, संजय राऊत यांच्याकडे बोट

अमोल कोल्हे यांना मी एवढंच सांगतो की त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला कमी सल्ला द्यावा. धानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवावर वडेट्टीवार यांनी त्यांचं मत मांडलं. तसेच मविआच्या निवडणुकीतील पराभवाबद्दल बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे बोट दाखवलं. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून राज्यात महायुतीने प्रचंड बहुमतासह सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर आता मविआ नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं सुरू झाल्याचं दिसतं आहे.

हे पण वाचा- MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”

संजय राऊत यांचीही कांँग्रेसवर टीका

जागा वाटपात वडेट्टीवार होतेच. त्यांनी विदर्भातील जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सोडल्या असत्या तर बरं झालं असतं. कारण त्या जागा ते हरले आहेत. चंद्रपूरची जागा किशोर जोरगेवार राष्ट्रवादीतून लढणार होते. यासाठी १७ दिवस राष्ट्रवादीने प्रयत्न केले. पण काँग्रेसने ही जागा सोडली नाही. अखेर किशोर जोरगेवार भाजपात गेले आणि जिंकले. काही लोकांना वाटत होतं की आम्हीच जिंकू. आम्हाल जागा मिळायला पाहिजे. देशातील वातावरण बदललं आहे, वगैरे”, असं म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली आहे.

नितीन राऊत काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आम्ही म्हणजेच महाविकास आघाडीने फक्त वाटाघातीत वेळ घालवला. संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केले, अशी स्पष्ट कबुली काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिली आहे. आमचा पराभव झाला हे मान्य करावंच लागेल. वाटाघाटींमध्ये आम्ही गाफील राहिलो. गाफिल राहणं एकट्याकडून झालेलं नाही. महाविकास आघाडी केली तेव्हा आघाडीने लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवलं. त्यानंतर आमचा वाद मुख्यमंत्रिपदावरुन वाद घालत बसलो, वाटाघाटीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर काय चित्र आहे हे पाहण्यात आम्ही पाहू शकलो नाही हे मान्य करावंच लागेल. गाफिलपणा झाला, त्याचे परिणाम आम्ही पाहतो आहोत असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

महायुतीचा विजय होऊन सरकार स्थापन झालं आहे. मात्र आता महाविकास आघाडीतले वाद हे चव्हाट्यावर येत आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना वादाच्या या ठिणग्या पडताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकसंध राहणार की उभा दावाच दिसणार? हे पाहणं निश्चतच महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader