MCD Election bollywood singer mika singh sawan me lag gayi aag to encourage people to vote for AAP ssa 97 | Loksatta

MCD Elcetion 2022 : ‘सावन मे लग गयी आग’, गाणं गात मिका सिंगचा ‘आप’ उमेदवारासाठी प्रचार

दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी ४ डिसेंबरला मतदान होणार आहे.

MCD Elcetion 2022 : ‘सावन मे लग गयी आग’, गाणं गात मिका सिंगचा ‘आप’ उमेदवारासाठी प्रचार
मिका सिंग ( आप दिल्ली ट्विटर छायाचित्र )

साऱ्या देशाचे लक्ष गुजरात विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. आज ( १ नोव्हेंबर ) गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष ( आप ) यांच्यात लढत होत आहे. त्यातच दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे. येत्या ४ डिसेंबरला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

भाजपाकडे महापालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस आणि आपकडून जोरदार प्रचारात करण्यात येत आहे. तर, आपच्या प्रचारासाठी बॉलिवूड गायक मिका सिंग याने उडी घेतली आहे. मिका सिंगने आपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. त्यासाठी त्याने गाणेही गायलं आहे.

हेही वाचा : “१०० तोंडांचे रावण” म्हणणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली की…”

दिल्लीतील चांदणी चौकात आपच्या वतीने जनसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आपचे उमेदवार सरदार पुर्नदीप सिंग साहनी यांच्या प्रचारासाठी ही जनसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार राघव चड्डा हे सुद्धा उपस्थित होते. या प्रचारसभेत मिका सिंग याने हजेरी लावली. तसेच, ‘सावन मे लग गयी आग’ हे गाण गात सरदार पुर्नदीप सिंग साहनी यांना मते देण्याचे आवाहन मिका सिंगने केलं आहे.

यावेळी बोलताना मंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपावर हल्लाबोल केला. “चांदणी चौक शान नाहीतर दिल्लीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जे दिल्लीतील लाखो नागरिकांना रोजगार देते. मात्र, तरीही भाजपा व्यावसायिकांना सुविधा देण्याच्या ऐवजी लुटत आहे. भाजपाने १५ वर्षापासून चांदणी चौकाला कचऱ्यात रुपांतरीत केलं आहे,” अशी टीका सिसोदिया यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 21:08 IST
Next Story
भारत जोडो यात्रेतून काय मिळालं? तुमच्यात काय बदल झाला? राहुल गांधी म्हणाले “मी बऱ्याच वर्षांपूर्वी…”