दिल्ली महापालिकेतील (एमसीडी) २५० वॉर्डांचे सदस्य निवडण्यासाठी आज (४ डिसेंबर) मतदान सुरू आहे. यादरम्यान मतदान यादीत अनेक नावे न आढळल्याने आम आदमी पार्टीने हे षडयंत्र म्हटल्याचा आरोप केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले की, अनेक नावे मतदान यादीत नाहीत. मतदान केंद्राबाहेर लोकांनी मतदान यादीत नाव नसल्याची तक्रार केली आहे. मतदान यादीत नाव नसल्याने लोक नाराज आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली महापालिका निवडणुकीत १.४५ कोटी मतदार मतदान करत आहेत. महापालिकेच्या २५० जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी एकूण १ हजार ३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीकवासीयांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना शहराला एक स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे आवाहन केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcd election many names missing from voting list aap will complain to the election commission msr
First published on: 04-12-2022 at 16:22 IST