मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी राज्यातील निवडक नेत्यांची बैठक बोलावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>“मतांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकवा”, राज ठाकरे यांचे मतदारांना आवाहन

हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसने राज्यातील निवडणुकीसाठी अधिक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. यातूनच राहुल गांधी हे निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. जागावाटप, प्रचाराची तयारी, प्रचारातील मुद्दे, मतांचे विभाजन टाळण्यासाठी कोणते उपाय योजता येतील यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

नावे छाननी समितीकडे…

काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक सोमवारी सायंकाळी मुंबईत होत आहे. यात उमेदवारांची नावे किंवा पॅनेल निश्चित करून ही नावे केंद्रीय छाननी समितीकडे सादर केली जातील.