ईशान्येमधील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकालही जाहीर झाले आहेत. या तीन राज्यांपैकी मेघालयमधील निकालाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. कारण येथे कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. मेघालयमध्ये कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) पक्ष भाजपाला सोबत घेत सरकार स्थापण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी राज्यपालांकडे ३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्रही दिले आहे. मात्र कोनराड यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा केलेला असताना तृणमूल काँग्रेसचे मुकुल संगमा यांनीदेखील आमच्याकडे बहुमत आहे, असा दावा केल्यामुळे येथे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

हेही वाचा >>>> पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठा झटका, पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय; ममता बॅनर्जींची चिंता वाढली!

muzaffar beg kashmir loksabha
काश्मीरमध्ये लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी भाजपा सज्ज; पहाडी नेते मुझफ्फर बेग यांना पक्षाचा पाठिंबा मिळेल का?
Charity Commissioner in High Court
निवडणूक कामे करा, अन्यथा फौजदारी कारवाई; सरकार-निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात धर्मादाय आयुक्त उच्च न्यायालयात
mahayuti ahmednagar
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित
President Ram Nath Kovind and narendra modi
भाजपा अन् देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना; ४० वर्षांपूर्वीचा इतिहास काय?

मेघालयमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?

मेघालयमध्ये एकूण ६० जागांसाठी निवडणूक पार पडणार होती. मात्र ऐनवेळी सोहियोंग मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे निधन झाले. त्यामुळे येथे ५९ जागांवर निवडणूक पार पडली. दरम्यान या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला २६ जागा मिळाल्या आहेत. तर तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला पाच जागा जिंकता आल्या आहेत. भारतीय जनता पार्टी, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (HSPDP), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षांना प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळाला आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचा ११ जागांवर विजय झाला असून हा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. व्हॉइस ऑफ द पीपल्स पार्टीचा चार जागांवर विजय झाला आहे.

हेही वाचा >>>> त्रिपुरामध्ये भापजपाकडून महिलेला मुख्यमंत्रीपद? माणिक साहांची केंद्रात वर्णी?

३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा कोनराड संगमा यांचा दावा

कोनराड संगमा यांच्या एनपीपी पक्षाचा एकूण २६ जागांवर विजय झाला आहे. सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे संगमा यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आम्हाला ३२ आमदारांचे समर्थन आहे, असा दावा संगमा यांनी केला असून या सर्व ३२ आमदारांच्या सह्यांचे पत्र त्यांनी राज्यपालांना पाठवलेले आहे. यामध्ये भाजपाचे दोन आमदार तसेच अन्य अपक्ष आमदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे HSPDP पक्षाच्या दोन आमदारांचाही आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा संगमा यांनी केला आहे.

आम्हीच सरकार स्थापन करणार- तृणमूल काँग्रेस

मिळालेल्या माहितीनुसार, संगमा यांनी राज्यपालांना दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रावर HSPDPच्या दोन आमदारांच्या सह्या आहेत. मात्र ऐनवेळी HSPDP पक्षाने आमचा संगमा यांना पाठिंबा नाही, असे जाहीर केले आहे. तशा आशयाचे निवेदनच HSPDP पक्षाने जारी केले आहे. एकीकडे HSPDP ने संगमा यांना आमचा पाठिंबा नसल्याचे सांगितलेले असतानाच दुसरीकडे अवघ्या चार जागांवर निवडून आलेल्या तृणमूल काँग्रेसने आमच्याकडेही बहुमत आहे, असा खळबळजनक दावा केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुकुल संगमा यांनी युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीसोबत (यूडीपी) बोलणी सुरू केली आहेत. यूडीपीचा एकूण ११ जागांवर विजय झालेला असून हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तृणमूल काँग्रेस गैरभाजपा, गैरएनपीपी आघाडी करून मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, HSPDP, पीडीएफ या पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडली आहे.

हेही वाचा >>>> बसवराज बोम्मई की पुन्हा एकदा येडियुरप्पा? कर्नाटकमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण?

आम्ही ऐन वेळी सर्व गोष्टी उघड करू- मुकुल संगमा

कोनराड संगमा यांच्या एनपीपी पक्षाकडे २६ आमदार असून त्यांना बहुमतासाठी अवघ्या पाच आमदारांची गरज आहे. याच कारणामुळे मेघालयमध्ये एनपीपी सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. मात्र तृणमूल काँग्रेसचे मुकुल संगमा यांच्याकडून, आमच्याकडेही बहुमत आहे, असा दावा करण्यात आला आहे. ऐन वेळी आम्ही सर्व गोष्टी उघड करू, असे मुकुल संगमा म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी काळात मेघालयच्या राजकीय वर्तुळात काय घडामोडी घडणार, तसेच येथे कोण सरकार स्थापन करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.