वर्धा : जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा गवगवा करण्यात आला होता. अर्थात सर्वाधिक सदस्य नोंदणी केल्याने हा दावा झाल्याचे सांगण्यात आले. आता यावर्षी पण दावा होणार, असे चित्र आहे. तशी तयारी सदस्य नोंदणीची झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागल्या असल्याने देश पातळीपेक्षा उशिरा ही प्रक्रिया सूरू झाली. त्यासाठी २१ डिसेंबरला नागपुरात कार्यशाळा झाली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदस्य केले. त्यानंतर २६ डिसेंबरपर्यंत राज्यभर जिल्हानिहाय कार्यशाळा झाल्या. तर सदस्य नोंदणी मोहीम १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान चालणार आहे.

मात्र या सदस्य नोंदणी मोहिमेत ५ जानेवारी हा दिवस महत्वाचा ठरणार. कारण पक्षाने या दिवशी विशेष सदस्य नोंदणी अभियान पुकारले आहे. पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार हे स्वतः पुढाकार घेत बूथ पातळीवार नोंदणीत सक्रिय राहतील. त्यांना ठरवून दिलेल्या बूथवर हजर राहून इतरांची मोठ्या संख्येत सदस्य नोंदणी करवून घ्यायची आहे. त्यात दिरंगाई चालणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या दिवशी एका बूथवर किमान २०० व्यक्तींना पक्षाचे ऑनलाईन सदस्य करून घ्यायचे आहे. तरच पुढचे प्रमोशन मिळणार. म्हणजे किमान ५० सदस्य केल्याशिवाय कोणासही सक्रिय सदस्य म्हणून मान्यता मिळणार नाही. तसे नं केल्यास मंडळ किंवा जिल्हा पदाधिकारी होता येणार नाही. ५ तारखेच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची जबाबदारी अर्चना वानखेडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर विधानसभा मतदारसंघनिहाय अविनाश देव, आशिष पोहाणे, राहुल चोप्रा, गुंडू कावळे हे जबाबदारी पार पाडतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी दिली.

welcome for the cadet soldiers participating in the Republic Day parade in New Delhi
नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी झालेल्या छात्र सैनिकांचे जोरदार स्वागत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
malang gad festival
मलंग गडाच्या उत्सवासाठी दोन्ही शिवसेनेची मोर्चेबांधणी; दोन्ही गटांकडून भाविकांना आवाहन, दोघांकडून तयारी
Krishnamai festival begins in Sangli from today
सांगलीत आजपासून कृष्णामाई उत्सव
tourism mahabaleshwar news in marathi
महाबळेश्वरला २६ ते २८ एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन, शंभूराज देसाई यांची माहिती
BJP member registration deadline has passed but not even half of target has been met
भाजप सदस्य नोंदणी! ‘तारीख पे तारीख’ सदस्य जुळता जुळेना
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
Uttarakhand UCC portal marriage registrations
Uttarakhand UCC: समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये विवाह नोंदणी कशापद्धतीने सुरू आहे?

हे ही वाचा… Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय?

हे ही वाचा… बुलढाणा : सरलेल्या वर्षात दिग्गजांना राजकीय धडे; नवख्यांसमोर आता संधीचे सोने करण्याचे आव्हान

या सर्व सदस्य नोंदणी प्रक्रियेचा आढावा प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण नियमित घेत आहे. तर विदर्भ संयोजक माजी आमदार. अनिल सोले जिल्हानिहाय लक्ष ठेवून आहेत. वर्धा जिल्ह्याचे किमान ३ लाख सदस्य नोंदणीचे लक्ष आहे. जिल्ह्यात चारही आमदार भाजपचेच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अधिक जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. याच दरम्यान १२ जानेवारीस शिर्डी येथे विशेष अधिवेशन असून वर्ध्यातून किमान ९०० सदस्य हजेरी लावतील.जिल्ह्यात एकूण १३४२ बूथ आहेत. या सर्व बूथचे नोंदणी नियोजन पूर्ण झाले असून ५ तारखेस महत्वाचे नेते हजेरी लावतील. मोठा नेता असो की छोटा कार्यकर्ता, यादिवशी त्यास सहभागी व्हावेच लागणार आहे.

Story img Loader