पंतप्रान नरेंद्र मोदी हे कायम चर्चेत असतात. नरेंद्र मोदी यांनी इतर देशांच्या प्रमुखांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी नरेंद्र मोदी यांचा इंटरनेट पोलमध्ये उच्च रँकिंगसाठी उल्लेख केला होता.  ते भारतीय पंतप्रधानांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत हे माहिती असूनसुद्धा त्यांनी मोदी यांची स्तुती करताना हात आखडता घेतला नाही. 

पहिल्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी मेक्सिकोचा दौरा केला होता. मोदींचा मेक्सिको दौरा अत्यंत यशस्वी झाला होता. जिथे त्यांना तत्कालीन अध्यक्ष एनरिक पेन्ना निएटो यांनी शाकाहारी जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये नेत असतानाचे छायाचित्र काढले होते. या फोटोची तेव्हा भरपूर चर्चा झाली होती.बुधवारी ओब्राडोर यांनी सूचित केले की मेक्सिकोने मोदींना  महत्त्व दिले आहे. राष्ट्रपती म्हणाले की ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी जागतिक युद्धाविरामासंदर्भात एक आयोग तयार करण्यासाठी ‘युएन’कडे लेखी प्रस्ताव सादर करण्याची योजना आखत आहेत. ज्यामध्ये पोप फ्रान्सिस, संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस आणि भारतीय पंतप्रधान यांचा समावेश असावा अशी मागणी ते करणार आहेत. 

या तिघांनी भेटून लवकरच सर्वत्र युद्धे थांबवण्याचा प्रस्ताव सादर केला पाहिजे आणि कमीतकमी पाच वर्षांसाठी युद्धविराम शोधण्यासाठी करार केला पाहिजे, जेणेकरून जगभरातील सरकारे या तीन लोकांना पाठिंबा देण्यासाठी स्वतःला झोकून देतील असे ओब्राडोर यांनी स्पष्ट केले. अशी युद्धविराम योजना तैवान, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास मदत करू शकते. त्यांनी चीन, रशिया आणि अमेरिकेला त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याचे विशेष आवाहन केले आहे.  केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी याबाबत सांगितले की, ओब्राडोर यांच्या वक्तव्याने मोद यांच्या नेतृत्वाचा जगाने आदर केला आहे.

ओब्राडोर हे २०१८ मध्ये तीन पक्षीय युतीचे प्रमुख म्हणून सत्तेवर आले. जवळजवळ सात दशके सत्तेत असलेल्या पक्षाला पराभूत करून ५३ % मते मिळवली होती. १९९० नंतर ते मेक्सिकोचे प्रमुख झालेले पहिले डाव्या विचारसरणीचे नेते आहेत. बीबीसीने दिलेल्या वृततानुसार “पॉवर माफियांच्या विरोधात त्यांनी स्वतःला विरोधी उमेदवार म्हणून उभे केले. त्यांनी भ्रष्टाचाराचा नायनाट करण्याची आणि गुन्हेगारी आणि गरिबीशी लढण्याची आश्वासने दिली आहेत”. 

विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाढवणे, वृद्धांसाठी कल्याणकारी योजना आणणे आणि वेतन वाढीसाठी कायदे करणे यासाठी ओब्राडोरचे कौतुक केले जात आहे. या वर्षी एप्रिलमध्ये, त्याच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात चार वर्षांनी ओब्राडोर यांनी जनमत चाचणी घेतली. यामध्ये लोकांना त्यांनी पद सोडावे की पुढे पदावर कायम राहावे यावर मतदान करण्यास सांगितले. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, “लोकांना त्यांना पदावरून दूर करण्याची संधी देणे हे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी तदिलेले एक वचन होते. मतदान फक्त 19% च्या आसपास झाले होते.  त्यामध्ये 90% पेक्षा जास्त मतदारांनी ओब्राडोरला पाठिंबा दिला होता.