जळगाव – घसरत्या दरामुळे निर्माण झालेली कापूसकोंडी आणि स्वत:च्या मतदारसंघातच निर्माण झालेली पाणी टंचाई स्वत: पाणी पुरवठा मंत्री असतानाही दूर करण्यात आलेले अपयश, यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील या विषयावर मौन बाळगून आहेत. स्वतःला पाणीवाले बाबा म्हणवून घेणाऱ्या गुलाबरावांना बळीराजाच्या प्रश्नांविषयी गांभीर्य किती, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.

खुद्द पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव, नशिराबादसह अनेक गावे पाण्यासाठी कासावीस झाली आहेत. जळगावसह जिल्ह्यातील विजेची समस्या, शेतीचे प्रश्न जटील होत चालले असून, शिंदे-फडणवीस सरकारमधील पालकमंत्री शेतकऱ्यांसह शेतमजूर, कामगारांच्या समस्या सोडविण्यात फारसे यशस्वी झालेले नाहीत. कधी हिंदुत्व, कधी मराठा, असे भावनाशील विषय पुढे करून जनतेला भेडसावणारे रोजचे प्रश्न बाजूला पडतील, अशी चलाखी केली जात आहे.

different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
lok sabha elections 2024 dcm devendra fadnavis announced name of shrikant shinde from kalyan
श्रीकांत शिंदेंचे ‘कल्याण’; फडणवीसांची ठाण्यात ‘पाचर’, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघावर अप्रत्यक्ष दावा
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…

हेही वाचा – सांगली भाजपमध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ?

२०२१-२२ पासून अतिवृष्टी आणि गारपीटग्रस्तांचे अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. गेल्या हंगामातील कापूस अजूनही ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या कापूसकोंडीबाबत पालकमंत्री गप्प आहेत. मध्यंतरी भाजपचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी १५ दिवसांत कापसाच्या भावाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासित केले. गुलाबराव पाटील हे पालकत्व विसरून बोलघेवड्या पद्धतीने केवळ राजकारण करीत असल्याची विरोधकांकडून टीका होत आहे.

नशिराबाद, धरणगाव या आपल्या मतदारसंघातील गावांमध्ये टंचाईचा प्रश्न जटील झालेला असतानाही पालकमंत्र्यांनी त्यांचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. वाढदिवशी सभेला उसळलेला जनसागर पाहून आज निवडणूक झाली तर आजच आपण जिंकलेलो आहोत असे वाटते, अशा स्वस्तुतीत गुलाबराव रमले. सभेतील तरुणाईचा सहभाग पाहून युवासेनेचा जिल्हाप्रमुख झाल्यासारखे वाटते, असे पालकमंत्री म्हणत असले तरी या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणारा एखादा मोठा प्रकल्प जिल्ह्यात त्यांना आणता आलेला नाही, हे वास्तव आहे. धरणगावचे नगराध्यक्ष होते, तेच पाण्यासाठी मोर्चा काढत असल्याचे जनतेच्या लक्षात आल्याची टीकाही पालकमंत्र्यांनी केली.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याला वादाची झालर

एकिकडे गुलाबराव पाणीपुरवठा योजनांच्या वेगवेगळ्या घोषणा करीत आहेत; परंतु, त्यांच्याच जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात पिण्याचे पाणी वेळेवर येत नसल्याने अनेक वेळा आंदोलने झाली आहेत. त्यांच्या मतदारसंघातील नशिराबाद, ममुराबादसह अनेक गावांत पाणीप्रश्नासह विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. धरणगावकरांना बारा दिवसाआड पाणी मिळते. या समस्यांकडे पालकमंत्री गंभीरपणे पाहणार की, केवळ विरोधकांचे मोर्चे म्हणून दुर्लक्ष करणार, असा प्रश्न आहे.

जिल्हा प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ गोषवारा अहवालावरून ग्रामीण भागातील टंचाईची बिकट स्थिती समोर आली आहे. सरकारच्या सर्व योजनांची जिल्ह्यातील अंमलबजावणी पालकमंत्र्यांशी निगडित असते. राज्य सरकारमधील प्रत्येक विभागाशी संबंधित जिल्ह्यातील कामे करून घेण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची असते. त्यामुळे कापूस आणि पाणी प्रश्नावरून जिल्ह्यात निर्माण होत असलेला रोष शांत करण्याची जबाबदारीही भाजपचे गिरीश महाजन यांच्यापेक्षा पालकमंत्री म्हणून गुलाबरावांची अधिक आहे.