सुहास सरदेशमुख

औरंगाबाद: सुरक्षित पदवीधर मतदारसंघापेक्षाही गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविता येईल का, याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून केली जात आहे. ध्रुवीकरणातील नवे गणित लोकसभा मतदारसंघात जुळून आले तर राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातही नशीब अजमावण्याची तयारी करत आहे. गंगापूर मतदारसंघात सतीश चव्हाण यांचे दौरे वाढले आहेत. भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनीही वाढलेल्या दौऱ्यांची नोंद आमच्याकडे असून भविष्यात राजकीय पटमांडणीत भाजप विरोधात राष्ट्रवादी अशी रचना असू शकेल असे सांगण्यात येत आहे.

Yashwant Sena, Sanjay Kshirsagar
मोहोळमध्ये बलाढ्य राष्ट्रवादीशी झुंज देणारे संजय क्षीरसागर भाजपकडून बेदखल, यशवंत सेनेकडून उमेदवारी
mumbai police, former commissioner, arup patnaik, contest, lok sabha election, odisha, puri constituency, biju janta dal, lok sabha 2024, election, bjp, marath news, sambit patra,
अरुप पटनाईक ओडिशातून पुन्हा निवडणूक रिंगणात!
Candidates for Sunil Tatkare and Shivajirao Adhalrao Patil from Nationalist Congress Party lok sabha election pune news
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे, शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी; आणखी कोणाला उमेदवारी?
bhiwandi lok sabha election 2024 marathi news, bhiwandi latest news in marathi, bhiwandi lok sabha sharad pawar ncp marathi news
“यंदा भिवंडी मतदारसंघ सोपा, उमेदवाराची गफलत करु नका”, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पवारांना साकडे

हेही वाचा >>>डॉ. देवेंद्र वानखडे : लोकपाल आंदोलनातून राजकारणात

राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबाद जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही फारसे अस्तित्व नाही. महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये फारसे सदस्य नाहीत. शहरातील महत्त्वाच्या मोठ्या शैक्षणिक संस्थांवर मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पगडा आहे. मात्र, पदवीधर मतदारसंघ आणि विद्यापीठाच्या राजकारणावरचा पगडा वगळता राष्ट्रवादीला हात पाय हालवता आले नाहीत. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आमदार सतीश चव्हाण प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा अथवा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अस्तित्व असू शकते, अशा हालचाली राजकीय पटलावर सुरू आहेत. गंगापूर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये सतीश चव्हाण यांनी भेटी दिल्या आहेत. गंगापूर हा भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी बांधलेला मतदारसंघ आहे. मतदारसंघातील प्रत्येक घरातील सदस्यांपासून ते प्रत्येक योजनेचा लाभ कोणाला मिळाला याची माहिती आमदार बंब यांच्या कार्यकर्त्यांना असते. वॉटर ग्रीडसह विविध प्रकारच्या योजनांना निधी मिळविण्यातही ते अग्रेसर असतात. त्यामुळे गंगापूर मतदारसंघात पाय रोवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.मात्र, आमदार चव्हाण यांचे वाढते दौरे, सुरू केलेल्या बांधणीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून राजकीय पट मांडला जाण्याची शक्यता आहे.