देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी मोरारजी देसाई यांनी आणीबाणीच्या काळात केलेल्या कामाचे स्मरण केले. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र मोरारजी देसाईंच्या जयंतीदिनी गप्प राहणेच पसंद केले.

इंदिरा गांधींच्या पराभवासाठी विरोधकांचे नेतृत्व

Sanjay Patil vs laxmi hebbalkar
“त्यांना एक पेग…”, भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांची महिला मंत्र्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप

मोरारजी देसाई यांचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ रोजी झाला. त्यांनी १९७७ ते १९७९ या काळात जनता सरकारचे नेतृत्व केले. ते मूळचे काँग्रेसचे नेते होते. १९६९ साली काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ते कांग्रेस (ओ) गटात सामील झाले होते. आणीबाणीनंतर त्यांनी इंदिरा गांधी यांच्या पराभवासाठी विरोधकांचे नेतृत्व केले होते.

हेही वाचा >> नामांतराला एमआयएम रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त करणार

जयंतीदिनी राष्ट्रीय राजकारणात दोन प्रवाह

मोरारजी देसाई यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय राजकारणात दोन वेगवेगळे प्रवाह पाहायला मिळाले. भाजपाने देसाई यांना त्यांच्या आणीबाणीतील कामाचे स्मरण करत श्रद्धांजली वाहिली. तर काँग्रेसने मात्र त्यांच्या जयंतीदिनी गप्प राहण्याचे धोरण स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मोरारजी देसाई यांनी आणीबाणीला विरोध केला. तसेच त्यांनी आणीबाणीनंतर केलेले काम अनुकरणीय आहे,’ असे म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर केंद्रीय राज्यमंत्री ओम प्रकाश यांनीदेखील ‘भारतरत्न मोरारजी देसाई यांनी त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करतो. त्यांनी स्वत:साठी तसेच इतरांसाठी सर्वोच्च मूल्ये अंगिकारली. त्यांनी स्वत:ला झोकून देत देशाची सेवा केली,’ असे स्मरण केले.

हेही वाचा >> भाजपाचे ‘मिशन पंजाब’; व्यसनमुक्ती यात्रा आणि मोदी-शहांच्या दौऱ्यामुळे आप सरकार दबावाखाली

मोरारजींच्या जयंतीनिमित्त काँग्रेस गप्प

काँग्रेसने मात्र मोरारजी देसाई यांच्या जयंतीनिमित्त गप्प राहणेच पसंद केले. देसाई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे नेते होते. पंडित नेहरूंच्या (१९६४) तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या (१९६६) निधनानंतर देसाई यांच्याकडे पंतप्रधानपद सोपवण्यात आले होते. देसाई यांनी पुढे आणीबाणीला कडाडून विरोध केला होता. आणीबाणीमध्ये त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. आणीबाणीनंतर १९७७ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देसाई यांनी विरोधकांचे नेतृत्व केले आणि इंदिरा गांधी यांना पराभूत केले होते. पुढे ते गैर-काँग्रेस सरकारचे पहिले पंतप्रधान ठरले.