वसंत मुंडे

बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बीडला ज्योती विनायक मेटे यांच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याच दिवशी फडणवीस यांचे खास दूत समजले जाणारे भाजपचे महामंत्री आमदार श्रीकांत भारतीय यांनी श्रीक्षेत्र भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांचे दर्शन घेत प्रदीर्घ चर्चा केली. भाजपच्या पंकजा व खासदार प्रीतम मुंडे यांच्या गैरहजेरीत फडणवीसांचा दौरा आणि आमदार भारतीय यांची गडावरील भेटीने भाजप अंतर्गत नेमके काय चालले आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक शक्तीस्थळ भगवानगडावर महंत नामदेव शास्त्री यांनी भाषणबंदी केल्यानंतर पंकजा मुंडे गडापासून दूर झाल्या. या पार्श्वभूमीवर मुंडेंच्या जिल्ह्यात भाजपच्या नेतृत्वाने नव्या राजकीय समीकरणांची बांधणी सुरू केली आहे का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांनी मुंडे भगिनी समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

हेही वाचा… पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदल मोहिमेत धुसफूस

बीड जिल्हा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला. प्रदेश पातळीवर पक्षांतर्गत टोकाच्या स्पर्धेतही जिल्ह्यात प्रभाव आणि श्रीक्षेत्र भगवानगडाच्या माध्यमातून समाजावरील पकड कायम ठेवली होती. मुंडे यांच्यानंतर आठ वर्षांपूर्वी पक्षाची सूत्रे पंकजा यांच्याकडे आल्यानंतर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचा दावा केल्याने सुरुवातीपासूनच पक्षांतर्गत देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यात नेतृत्वाचा संघर्ष पेटल्याचे अनेक घटनांवरुन समोर आले. दरम्यान श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी दसरा मेळाव्यात भाषणबंदी केल्यानंतर शास्त्री आणि पंकजा यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि पंकजा यांनी स्वतंत्र भगवान भक्तीगड स्थापन केला. मागील विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर पक्षाच्याच नेत्यांनी विरोधकांना रसद पुरवल्याचा आरोप करत पराभवाचे खापर फडणवीसांच्या माथी मारले. तर इच्छा असतानाही विधान परिषदेवर ऐनवेळी पंकजा यांच्याऐवजी रमेश कराडांना तर केंद्रात खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. तेव्हापासून तर मुंडे भगिनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमापासून अलिप्त असून त्यांचे समर्थक समाजमाध्यमातून फडणवीसांना लक्ष्य करतात. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अतुल सावे यांनी बीडमध्ये ज्योती मेेटे यांच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला हजेरी लावली. तर भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवासस्थानी पाहुणचार घेत भाजपचे विद्यमान आमदार व काही पदाधिकार्यांबरोबर सविस्तर चर्चाही केली. मात्र फडणवीसांच्या दौर्यापासून मुंडे भगिनी व त्यांचे समर्थक अलिप्त राहिले. मुंडे भगिनी वगळता भाजप जिल्हाध्यक्षांसह आमदारही फडणवीसांच्या दौर्यात सहभागी झाल्याने पक्षात जिल्हापातळीवरही आता मुंडे भगिनीच एकट्या पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा…नगरच्या नामांतरावरून भाजप खासदाराचा स्वपक्षीय आमदारालाच घरचा आहेर

दुसरीकडे त्याच दिवशी फडणवीस यांचे खास भाजपचे महामंत्री आमदार श्रीकांत भारतीय यांनी थेट भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांचे दर्शन घेतले आणि प्रदीर्घ चर्चा केली. गडावरील विकासकामांची पाहणी करून शास्त्रींच्या कामाचे कौतुक केले. वारकरी सांप्रदाय अत्यंत सोप्या पद्धतीने शास्त्री सांगतात. आपले कुटुंब वारकरी सांप्रदायातील असल्याने अनेक वर्षांपासून गडावर येण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली असे श्रीकांत भारतीय यांनी सांगितले. एकाच दिवशी मुंडे भगिनींच्या गैरहजेरीत फडणवीसांचा बीड दौरा आणि आमदार भारतीय यांची भगवानगडावरील भेट हा योगायोग असला तरी यातून भविष्यातील राजकीय बांधणी होत आहे काय, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. या दोन घटनांनी भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने अप्रत्यक्ष मुंडे भगिनींना योग्य तो राजकीय संदेश दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत असल्याने मुंडे भगिनी समर्थकांत अस्वस्थता पसरली आहे.