पुणे कॉंग्रेसची मरगळ कधी दूर होणार ? |municipal election congress does not yet have a city president congress rahul gandhi arvind shinde pune | Loksatta

पुणे काँग्रेसची मरगळ कधी दूर होणार ?

महापालिका निवडणुका कधीही होण्याची शक्यताअसताना पुण्यात काँग्रेस ही आंदोलनापलीकडे निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने काहीही करत नसल्याचे चित्र आहे.

पुणे काँग्रेसची मरगळ कधी दूर होणार ?
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

सुजित तांबडे

महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतरही पुण्यातील काँग्रेस अद्याप सुस्तावलेल्या स्थितीतआहे. सहा महिने होत आले, तरी काँग्रेसला पूर्णवेळ शहराध्यक्ष नेमण्यासाठी वेळ मिळालेला नाही. सध्या प्रभारी शहराध्यक्षाच्या हाती कारभार असताना अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे. पक्षाचेअस्तित्व दाखविण्यासाठी आंदोलन करणे, हा एकमेव मार्ग उरला असला, तरी आंदोलनाच्या ठिकाणी प्रमुख पदाधिकारीच अनुपस्थित राहत असल्याने ही गटबाजी आता उघडपणे दिसू लागली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू होण्यापूर्वी पूर्ण वेळ शहराध्यक्ष नेमण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता राज्य आणि जिल्हा पातळीवरीलअध्यक्षांच्या नेमणुका होण्याची प्रतीक्षा आहे. महापालिका निवडणुका कधीही होण्याची शक्यताअसताना पुण्यात काँग्रेसही आंदोलनापलीकडे निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने काहीही करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसची स्थिती ही मरगळलेल्या अवस्थेत आहे.

हेही वाचा: कोल्हापूरातील निस्तेज मनसेमध्ये चैतन्य जागवण्याचे राज ठाकरे यांच्यासमोर आव्हान

अरविंद शिंदे हे प्रभारी शहराध्यक्ष म्हणून जून महिन्यापासून काम पाहत आहेत. आता राष्ट्रीयअध्यक्षांची नेमणूक झाल्यानंतर राज्य आणि जिल्हा पातळीवरील अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरूहोईल, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. शिंदे यांच्याकडे हे पद देण्यापूर्वी माजी मंत्री रमेश बागवे शहराध्यक्ष होते. आता पुन्हा एकदा पूर्णवेळ शहराध्यक्ष नेमण्याची मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सुरू झाली आहे.

आंदोलनातही गट-तट

पक्षाची ताकद दाखविण्यासाठी आंदोलन करतानाही गट-तट दिसून येत आहेत. नुकतेच काँग्रेसकडून रामदेवबाबा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे पक्षाची ताकद दिसण्याऐवजीआंदोलनाच्या निमित्ताने अंतर्गत गटबाजीचे प्रदर्शन कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले.

हेही वाचा: मुलाच्या विवाह सोहळ्यात दिसली जयंत पाटील यांची राजकीय शक्ती; प्रतीक पाटील यांच्यासाठी तयारी सुरू

सुनेसुने काँग्रेस भवन

एकेकाळी काँग्रेस भवन हे कायम माणसांनी, कार्यकर्त्यांनी गजबजलेले असायचे. सुरेश कलमाडी हे खासदार असताना एक खासदार, चार आमदार आणि महापालिकेत सत्ता काँग्रेसच्या हाती होती. तेव्हा काँग्रेस भवन हे कार्यकर्त्यांचे कामे करून घेण्यासाठी हक्काचे ठिकाण होते. दिवसभर कोपऱ्या-कोपऱ्यात किमान ५० ते ६० जणांचे घोळके थांबलेले दिसायचे. एकेकाळी माणसांच्या गर्दीतील काँग्रेस भवन हे आता सुनेसुने झाले आहे. काँग्रेस भवनात आता स्मशान शांतता असते. त्यामुळे ही मरगळ केव्हा आणि कशी झटकणार, हा प्रश्न आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 09:35 IST
Next Story
गेहलोत यांनी पायलट यांना ‘गद्दार’ म्हटल्यावर जयराम रमेश यांनी ठणकावलं; म्हणाले, “काही शब्दप्रयोग…”