Subhash Pawar vs Kapil Patil in Murbad Assembly Constituency : ‘लोक सांगायचे की पैसे सांभाळून ठेवा वाईट वेळेत कामा येतील, पण मी सांगतो की पैशांएवजी सुभाष दादा यांच्या सोबत राहा वाईट वेळच येणार नाही’, अशी प्रतिक्रिया असलेली एक व्हिडीओ रील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे मुरबाड विधानसभेचे उमेदवार सुभाष पवार यांनी नुकतीच आपल्या सोशल मिडीया खात्यावर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांची साथ स्वपक्षिय आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध लढणाऱ्या सुभाष पवार यांना आहे का अशा चर्चांना उधाण आले आहे. किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून उघड संघर्ष सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुभाष पवार राजकारणासोबतच त्यांच्या जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यरत असतात. नवरात्रोत्सवाच्या काळात जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ६ ऑक्टोबर रोजी रंगलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना पाटील यांनी सुभाष पवार यांचे कौतुक केले होते. त्यावेळी बोलताना पाटील यांनी सुभाष पवार यांना साथ द्या, तुमच्यावर वाईट वेळ येणार नाही असे वक्तव्य केले होते. ते वक्तव्य केले त्यावेळी पवार शिवसेनेत (शिंदे) होते. मात्र सुभाष पवार यांनी नुकतेच कपिल पाटील यांच्या भाषणाचा हाच भाग आपल्या समाज माध्यम खात्यावर प्रसारीत केला आहे. त्यामुळे कपिल पाटील यांची साथ सुभाष पवार यांना आहे का अशा चर्चांना उधाण आले आहे.

bjp mla kisan kathore
मुरबाडमध्ये किसन कथोरेच भाजपचे उमेदवार; पक्षाअंतर्गत विरोधकांची कोंडी, पक्षांतरांच्या चर्चांनाही पूर्णविराम
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Subhash Pawar, Murbad Vidhan Sabha assembly, election 2024
मुरबाडमधून सुभाष पवारांची बंडखोरी, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश, उमेदवारीवरही शिक्कामोर्तब
political party create challenges before BJP MLA Kisan Kathore
Maharashtra Election 2024 : मुरबाडमध्ये कथोरेंच्या अडचणींमध्ये वाढ
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Devendra Bhuyar, Rajkumar Patel
Morshi Assembly Constituency: मोर्शीत भाजप आणि राष्‍ट्रवादी अजित पवार गट आमने-सामने; देवेंद्र भुयार राष्‍ट्रवादीकडून लढणार
kisan kathore kapil patil
कथोरेंविरूद्ध निष्ठावंतांची आघाडी ? कपिल पाटलांच्या नेतृत्वात मेळावा, कथोरेंना अप्रत्यक्ष आव्हान देण्याची खेळी
mla kisan kathore meet cm eknath shinde
स्थानिक शिवसैनिक विरोधात, मात्र कथोरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण, शिवसैनिक भूमिका बदलणार का याकडे लक्ष

हे ही वाचा… Congress in Maha Vikas Aghadi: आक्रमक नानांमुळे मविआतील घटकपक्षांना लगाम?

हे ही वाचा… Pachora Assembly Constituency : पाचोऱ्यात बहीण-भावात लढत

मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्या आणि कपिल पाटील यांच्या गेल्या काही दिवसांपासून विस्तवही जात नाही. आपल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर पाटील यांनी कथोरे यांच्यावर फोडले होते. सोबतच कथोरे यांना वेळोवेळी आव्हान दिले होते. आता विधानसभा निवडणुकीसाठी किसन कथोरे यांनी गुरूवारी अर्ज दाखल केला. यावेळी कपिल पाटील अनुपस्थित होते. त्याचवेळी कल्याण आणि भिवंडीच्या भाजप उमेदवारांच्या कार्यक्रमात मात्र पाटील उपस्थित होते. त्यातच सुभाष पवार यांनी हा रील पोस्ट केल्याने मतदारसंघात पाटील यांचा छुपा पाठिंबा सुभाष पवार यांना असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Story img Loader