आपल्या पक्षाच्या विचारांशी वचनबद्ध आणि कन्नूर लॉबीमधील मुख्य व्यक्ति मानण्यात येणाऱ्या एम व्ही गोविंदन यांनी नेमणूक केरळ राज्य युनिटचे प्रमुख म्हणून करण्यात आली. ६९ वर्षीय गोविंदन हे तीनदा आमदार म्हणून निवडून आले होते. विजयन यांच्यानंतर सरकारमध्ये त्यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्वत:च्या अनारोग्यामुळे स्वेच्छेने पायउतार झालेल्या कोडीयेरी बाळकृष्णन यांचा वारसा पुढे नेणारे सक्षम नेतृत्व म्हणून गोविंदन यांच्याकडे पाहिले जाते.   

एकेकाळी शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक असलेल्या गोविंदन यांना “मास्टर”ही संबोधले जाते. कन्नूरमध्ये, ते “लाल दल”चे प्रमुख आहेत. त्यामुळे जरी मूळ शिक्षकी पेशा सोडून ते पूर्णवेळ राजकारणात आले असले तरीही मार्क्सवादी विचारांचा तरूण घडवणे सुरूच आहे. सध्या ते तिरूवनंतपूरम येथील अभ्यास आणि संशोधन केंद्र, ईएमएस अकॅडमीचे प्रमुख आहेत. सीपीएम(एम) च्या राज्य समितीने आपल्या कॅडरकरिता २००१ दरम्यान या केंद्राची स्थापना केली होती.   

या नवनिर्वाचित केरळ राज्य सचिवांचा जन्म कन्नूरमधील मोराझा गावात झाला. हे गाव म्हणजे उत्तर केराळातील शेतकरी चळवळीचे केंद्र होते. १९४० दरम्यान ब्रिटीश साम्राज्यवादाविरुद्ध लढा देणारे गाव अशी त्यांच्या जन्मस्थानाची ओळख आहे.   गोविंदन यांनी सीपीआय(एम) पक्षात पार्टीची उमेदवारांसाठी वर्ग, मीडिया तसेच चळवळींत सक्रीय पुढाकार घेतला. ते १९८२ मध्ये कासारगोडचे तालुका सचिव झाले, २००२ मध्ये त्यांची निवड जिल्हा सचिवपदी करण्यात आली. त्यांनी हा पदभार सहा वर्षे सांभाळला. तसेच पक्षाचे मुखपत्र देशाभिमानी’चे मुख्य संपादकपदही सांभाळले. २०१८ मध्ये ते सीपीआय(एम) केंद्रीय समितीचे सदस्य झाले. शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याविषयी गोविंदन हे कायम आग्रही असतात. सध्या ते पक्षाची शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष आहेत.