Shiv Sena UBT To Go Solo In Local Body Election : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवानंतर महाविकास आघाडीचा आपल्याला फायदा काय? असा प्रश्न शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) कार्यकर्ते विचारत आहेत. यानंतर कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावाखाली, शिवसेनेने (यूबीटी) शनिवारी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये शिवसेनेसाठी (उद्धव ठाकरे) प्रतिष्ठित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे.

“मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महानगरपालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढू. एकदाच काय व्हायचे ते होऊद्या, आम्हाला स्व:ताला आजमावयचे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला यासाठी परवानगी दिली आहे,” असे विधान राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी नागपुरात केले होते. राऊत यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीसह महायुतीतूनही प्रतिक्रिया येत आहेत.

भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
BJP Candidate List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
BJP Candidate List : भाजपाकडून १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!
Karuna Sharma Cried
Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”
maharashtra vidhan sabha election 2024, chandrapur district, congress, bjp
लोकसभेतील मताधिक्य कायम राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान, भाजपला चिंता
Devendra Fadnavis on Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “राहुल गांधी लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देताय?”, देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल!
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

ठाकरेंवर कार्यकर्त्यांचा दबाव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) आमदार आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी दबाव येत होता. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अवघ्या ४६ जागा निवडून आल्या. यामध्ये शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) २०, काँग्रेसच्या १६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या १० जागांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर, पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीशी संबंध तोडण्याचा आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करावा, असे सांगितले होते. विधानसभेच्या निकालानंतर दोन दिवसांनी झालेल्या पक्षाच्या बैठकीत, बहुसंख्य आमदारांनी ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती केली होती.

या आमदार आणि नेत्यांनी असा युक्तिवाद होता की, महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास तळातील कार्यकर्त्यांशी पुन्हा संपर्क निर्माण करण्यास आणि त्यांना शिंदे सेनेकडे जाण्यापासून रोखण्यास मतद होईल.

मुंबई महापालिकेची निवडणूक

दरम्यान १९७० पासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षापासून वेगळे झाल्यास भाजपा आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला रोखण्यास मदत होईल असे, या आमदार आणि नेत्यांना वाटते.

नागपूरात संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी, ते महाविकास आघाडीपासून वेगळ होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे पक्षाच्या वाढ खुंटली. आमचा पक्ष भक्कम करण्यासाठी आम्ही आता महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि परिषदांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे.”

“जोपर्यंत आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत नाही तोपर्यंत आम्हाला आमची ताकद पूर्णपणे समजणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीची गरज होती. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवता आली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना ती संधी देण्याची संधी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर, आमच्या अनेक नेत्यांनी असे व्यक्त केले की, जर आपण स्वतंत्रपणे लढलो असतो तर आपल्याला २० पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या,” असे दक्षिण मुंबईचे शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत म्हणाले.

हे ही वाचा : Maharashtra Politics : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?

काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

दरम्यान शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) या घोषणेनंतर राज्य काँग्रेसने सावध प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या कार्यकर्त्यांचीही स्वतंत्रपणे लढण्याची भावना असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

“सर्वप्रथम, संजय राऊत हे पक्षाध्यक्ष नाहीत. उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली असती तर आम्ही प्रतिसाद दिला असता. आमचे असे मत आहे की अशी विधाने सार्वजनिकरित्या केली जाऊ नयेत आणि त्याऐवजी वरिष्ठ नेत्यांमध्ये प्रथम चर्चा केली पाहिजे,” असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि लोकसभा खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दरम्यान, महाविकास आघाडीत आणखी एक घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने (शरद पवार) म्हटले आहे की, त्यांचे राज्य नेतृत्व स्थानिक संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, याचा निर्णय त्यांच्या जिल्हा समित्या घेतील. “आम्ही स्थानिक पातळीवर काय सुरू आहे याचे माहिती घेऊन, स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार देतो,” असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले. यावेळी त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की यूपीए-१ आणि यूपीए-२ या दोन्ही काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या विविध भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या होत्या.

Story img Loader