भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मंगळवार २७ फेब्रवारी रोजी होणाऱ्या नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्र विकास मंडळ आणि विशेष पॅकेजचे आश्वासनही दिले.

भाजपा नॅशलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी(एनडीपीपी)सोबत आघाडी करून निवडणूक लढवत आहे. दोन्ही पक्ष एनडीपीपीच्या नेतृत्वाताली सत्तारुढ आघाडीचा भाग आहेत. एनडीपीपी ४० जागांवर आणि भाजपा २० जागांवर निवडणूक लढवत आहे.

Omraje nimabalkar Archana Patil Sanyojini Raje nimbalkar have purchased nomination papers
ओमराजे, अर्चना पाटील, संयोजिनी राजे यांनी घेतले उमेदवारी अर्ज, लोकसभेसाठी चौथ्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
odisha bjp lok sabha campaign
अभिनेते आणि खासदार अनुभव मोहंती आता भाजपाच्या मंचावर
Senior Men National Kabaddi Tournament from today Maharashtra vs Gujarat Kabaddi match sport news
महाराष्ट्राची सलामी गुजरातशी; वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आजपासून

भाजपा अध्यक्ष नड्डा यांनी कोहिमा येथे एका सभेत बोलताना एनडीपीपी-भाजपा आघाडीच्या संयुक्त अभियनाची सुरुवात केली. जिथे त्यांनी म्हटले की, भाजपा एकमेव असा पक्ष आहे जो राष्ट्रीय बांधिलकी आणि प्रादेशिक आकांक्षा समजतो. याचबोरबर नड्डा यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी उत्तर ईशान्य भागास नाकेबंदी, लक्षित हल्ले, दहशतवादास तोंड द्यावे लागत होते. मात्र आज नागालँड पुन्हा एकदा शांतात, समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर आले आहे.

याशिवाय, जाहीरनामा सादर करताना नड्डा म्हणाले की, आम्ही प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्व नागालँड विकास मंडळाची स्थापना करू. आम्ही पूर्व नागालँडच्या विकासासाठी एक विशेष पॅकेज देऊ आणि लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या दिशेने काम करू.