नागपूर : “उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा स्तोत्राच्या फक्त दोन ओळी तरी वाचून दाखवाव्यात” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, , “ हिंदुत्ववाद सोडण्याची शिक्षा म्हणून ठाकरे वाचतात रामरक्षा” भाजपनेत्या नवनीत राणा, ‘उद्धव ठाकरे ढोंगी ’महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. ही सर्व विधाने आहेत भाजपने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेची मुद्या आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीच्या निषेधार्थ नागपुरात होणारे‘रामरक्षा’ आंदोलन मुळमुद्यांना उत्तर देण्याऐवजी भाजपने त्यांनी सुरू केलेली व्यक्तिगत टीका ही अयोध्या मुद्यावर ठाकरेनी सोडलेले‘रामरक्षाअस्त्र’ भाजपच्या किती जिव्हारी लागलेयाचा प्रत्यय देणारीआहे.

‘रामरक्षा’आंदोलनाचा दुसरा टप्पा शनिवारी दुपारनंतर नागपुरात होणार आहे. या निमित्ताने भाजपची कोंडी करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. त्याला भाजपकडून देण्यात येत असलेल्या तीव्र प्रतिउत्तरांनी या आंदोलनाला अपेक्षेपेक्षा अधिक राजकीय धार आली आहे. आंदोलनावर प्रतिवाद करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनाच वैयक्तिक लक्ष्य करण्याची भाजपने त्यांची स्पर्धा सुरू आहे.उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील पहिल्या आंदोलनाची राजकीय चर्चा झाली, तेथे प्रचंड गर्दीही झाली. कारण तेथे ठाकरे गटाचे अस्तित्व अद्यापही कायम आहे. त्याची प्रचिती महापालिका निवडणुकीत दिसून आली. मात्र दुसरे आंदोलन नागपुरात होणार हे जाहीर झाल्यावर या आंदोलना बाबत साशंकता व्यक्त केली गेली.

कारण नागपूरचे समीकरण वेगळे आहे. भाजपचा बालेकिल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि आंदोलनाचे स्थळथेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील राम मंदिर. अशा परिस्थितीत संघटनात्मकताकद मर्यादित असतानाही ठाकरे गटाने नागपूरची निवड करणे धाडस मानले जात आहे. पण पण मागील चार दिवस नागपूरमध्ये तळ ठोकून बसलेल्या संजय राऊत यांनी बाजू पलटवली.

मुळात अयोध्या, राम मंदिर हे भाजप व संघासाठी संवेदनशील मुद्दे. रामाचे आम्हीच रक्षक असा या पक्षाचा दावा, अशा स्थितीत शिवसेनेने‘रामरक्षा’ आंदोलन करावे व तेही नागपुरात, मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात हे भाजपला खटकले. त्यात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांना रामरक्षापठणासाठी निमंत्रण दिले.त्यात फडणवीस यांना ते रामभक्त असल्याची, आणि अयोध्येच्या आंदोलनात सहभागी झाल्याची आठवण करून देण्यात आली. तसेच राम मंदिरातील चोरीमुळे आपणही दुखावला असाल, असा चिमटाही या पत्रात घेण्यात आला. त्यामुळे हे पत्र राजकीय वर्तुळात गाजले.

यामुळे आंदोलन राज्यभर चर्चेत येईल, अशी राऊत यांची अपेक्षा होती व झाले ही तसेच. राऊत यांचे पत्र प्रसिद्ध होताच भाजपच्या नेत्यांकडून आंदोलनाच्या मूळमुद्द्या पेक्षा उद्धव ठाकरे यांच्या वर हिंदुत्वाच्या मुद्यावरून वैयक्तिक टीकेचाभडी मार सुरू झाला. सुरुवात माजी आमदार संदीप जोशी यांनी केली. त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून खुले पत्र प्रसिद्ध करत, “राम आता का आठवले?” असा प्रश्न उपस्थित केला. मात्र या पत्रात अयोध्येतील दानपेटीतील कथित चोरीच्या आरोपावर भाष्य टाळण्यात आले.

अमरावतीच्या नवनीत राणा यांनी ‘ हिंदुत्व सोडण्याची शिक्षा- म्हणून वाचतात रामरक्षा’ या शब्दात लक्ष्य केले. त्यांनी नागपुरात येऊन ठाकरें विरुदध फलक लावले. तिकडे कोकणातील मंत्र्यांनी नेहमी प्रमाणे ठाकरेंवरआगपाखड केली. महसूल मंत्री चंद्रशेखऱ्बावनकुळे यांनी ही ठाकरे ’ढोंगी’ आहेत, अशी टीका केली.‘ठाकरेरामची‘रक्षा’कशी करू शकतात ? असा सवाल भाजपचेशहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनीकेला.

वास्तविक भाजपनेशिवसेनेच्या रामरक्षापठणाकडे एक आंदोलन म्हणूनपाहिलेअसते तर त्याचीचर्चाचझाली नसती, आंदोलन झाल्यावर रामाच्या मुद्यावरून ठाकरेंना कोंडीत पकडता आले असते. पण आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या आरोपांवर प्रतिवाद करण्याऐवजी भाजपनेत्यांनी वैयक्तिक टीका सुरू केल्याने ठाकरेंचे‘रामरक्षाअस्त्र’ भाजपवर प्रभावी ठरल्याचे सध्याचे चित्र आहे.