Najma Heptulla Book on Indira Gandhi: भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात आणीबाणीचा काळ सर्वाधिक चर्चिला गेलेला, टीका झालेला आणि त्यासंदर्भात राजकीय विश्लेषक व नेतेमंडळींमध्ये मतभेद असलेला मानला जातो. आणीबाणीचा काळ उलटून जवळपास ४७ वर्षं झाली असून अजूनही त्या कालखंडाच्या आठवणी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतात. याचसंदर्भात आता माजी केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये मोठा दावा केला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्या काळात पाहिल्यानंतर देशात आणीबाणी लागू केल्याचा त्यांना पश्चात्ताप होत असल्याचं आपलं मत झाल्याचा दावा हेपतुल्ला यांनी या पुस्तकात केला आहे.

‘इन परस्युएट ऑफ डेमॉक्रसी: बेयाँड पार्टी लाईन्स’ या नावाने नजमा हेपतुल्ला यांनी आपलं आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे. या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना आलेले अनुभव, भेटलेल्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडींबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. नजमा हेपतुल्ला यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केल्यामुळे त्यांनी पुस्तकात दिलेले संदर्भ अधिक महत्त्वाचे ठरतात.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Sanjay Raut on Mahavikas aghadi
Sanjay Raut : महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”

१९८० साली नजमा हेपतुल्ला काँग्रेसच्या तिकिटावर संसदेत निवडून आल्या होत्या. पण नंतर काँग्रेसमधून त्यांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली. २००४ साली त्या भाजपाकडून राज्यसभा खासदार झाल्या. याशिवाय २०१६ ते २०२१ या काळात नजमा हेपतुल्ला यांनी सध्या तणावग्रस्त झालेल्या मणिपूरचं राज्यपालपददेखील भूषवलं होतं. तसेच, त्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरूही राहिल्या आहेत.

इंदिरा गांधींशी झालेला संवाद!

नजमा हेपतुल्ला यांनी इंदिरा गांधींशी आणीबाणीवर कधी संवाद झाला नसल्याचं आत्मचरित्रात नमूद केलं आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या झालेल्या इतर संवादांमधून इंदिरा गांधींना आणीबाणी लागू करण्याचा पश्चात्ताप होत होता, असं आपलं मत बनल्याचं हेपतुल्ला यांनी या पुस्तकात नमूद केलं आहे. “मला कधीही इंदिरा गांधींशी आणीबाणीबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. पण माझं हे मत नक्की झालं आहे की त्यांना आणीबाणी लागू करण्याचा खूप खोलवर पश्चाताप होत होता. त्या म्हणाल्या होत्या, ‘मी पंतप्रधान होते, पण देश चालवण्यात येणाऱ्या इतक्या सगळ्या अडचणी मला माहिती नव्हत्या”, असं हेपतुल्ला यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

‘विश्वासू लोकांमुळे इंदिरा गांधींचा ऱ्हास’

याशिवाय, पुस्तकात नजमा हेपतुल्ला यांनी इंदिरा गांधींनी त्यांच्या विश्वासू लोकांनी त्यांना कसं नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला सांगितल्याचाही दावा केला आहे. त्यात त्यांचे विश्वासू प्रशासकीय अधिकारी आणि बंगालच्या राजकारणातील एक राजकीय सल्लागार, काही मित्र यांचा समावेश असल्याचं हेपतुल्ला यांनी पुस्तकात म्हटलं आहे. “जेव्हा इंदिरा गांधी या लोकांच्या नियंत्रणातून बाहेर पडून स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागल्या, तेव्हा या सगळ्यांनी इंदिरा गांधींना धडा शिकवायचं ठरवलं. या लोकांच्या अशा राजकारणामुळेच इंदिरा गांधींच्या पतनाला सुरुवात झाली”, असा दावा हेपतुल्ला यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

Indira Gandhi: इंदिरा गांधींनी राबवलेली आणीबाणी नेमकी काय होती? कारणे कोणती? परिणाम काय?

“या सगळ्यांचा विरोध मोडून काढत इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत परतल्या खऱ्या, पण मला नेहमीच आश्चर्य वाटत राहिलं आहे की या प्रक्रियेमध्ये त्या किती आणि कशा बदलल्या! यावेळी त्या अधिक खंबीर, अधिक निष्ठुर, अधिक कठोर आणि सत्तेचा वापर करण्यात अधिक निष्णात ठरल्या”, असं नजमा हेपतुल्ला यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

मनमोहन सिंग यांच्याबाबत नजमा हेपतुल्लांचा दावा

दरम्यान, हेपतुल्ला यांनी आत्मचरित्रात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काँग्रेसकडून योग्य तो सन्मान मिळाला नाही, असा दावा केला आहे. “जेव्हा ते पंतप्रधान होते, तेव्हा मी त्यांच्यासोबत काम केलेलं नाही. पण मला नेहमीच असं वाटत आलं आहे की जो सन्मान नरसिंह राव यांना मिळाला, तसा सन्मान मनमोहन सिंग यांना काँग्रेसकडून मिळू शकला नाही. त्यांच्या कामाची जशी दखल पक्षानं घ्यायला हवी होती, तशी घेतली गेली नाही. १९९८ ते २००४ या काळात मनमोहन सिंग विरोधी पक्षनेते म्हणून माझ्या बाजूच्याच बाकावर बसायचे”, असं पुस्तकात म्हटलं आहे.

Story img Loader