औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केल्याने सुमारे २८ वर्षांनंतर राज्यातील कोणत्याही शहरांच्या नावांत बदल झाला आहे. ‘बॉम्बे’चे मुंबई नामांतर करावे, अशी अनेक वर्षांची मागणी होती. शिवसेनेने यासाठी आंदोलन केले होते. १९८५ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यावर तत्कालीन महापौर छगन भुजबळ यांनी गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला मुंबई नावाची पाटी लावली होती. राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यावर बॉम्बेचे मुंबई नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात आला होता. यानुसार १९९५ मध्ये मुंबई हे नाव अधिकृतपणे अंमलात आले.

मधल्या काळात देशातील अनेक मोठ्या शहरांची नावे बदलण्यात आली. मद्रासचे चेन्नई झाले. कलकत्ताचे कोलकाता झाले. बंगळुरचे बंगळुरू, बेळगावचे बेळगावी, म्हैसूरचे म्हैसूरू अशा पद्धतीने कर्नाटकातील बहुतांशी शहरांची नावे बदलण्यात आली. ही नावे बदलताना कन्नड नावानी ही शहरे ओळखली जातील, अशी व्यवस्था करण्यात आली.

arun gawli marathi news, arun gawli jail marathi news
विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?
survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
divyang survey marathi news, maharashtra divyang survey marathi news
राज्यात तीस वर्षांनी दिव्यांग सर्वेक्षणाला मुहूर्त… होणार काय?

हेही वाचा – मनिष सिसोदियांच्या अटकेनंतर विरोधकांची एकजूट, काँग्रेस मात्र गप्प; जाणून घ्या कोणत्या पक्षाची काय भूमिका?

हेही वाचा – Exit Polls: त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपा सत्ता राखेल; मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याची मागणी शिवसेनेचीच होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी केली होती. याबरोबबरच उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सत्ताबदल होताच शिंदे सरकारने पुन्हा नामांतराचा निर्णय घेतला. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले आहे. जवळपास तीन दशकांनंतर राज्यातील दोन शहरांच्या नावांमध्ये बदल झाला आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा पद्धतीने नावांमध्ये बदल झाला. अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करावे, अशी मागणी आता करण्यात येत आहे. अर्थात त्यावरून नगर जिल्ह्यात सत्ताधारी भाजपमध्येच एकमत नाही. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा नामांतराला विरोध आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात यावर नगरचे नामांतर अवलंबून असेल.