नवीन पटनायक यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर अबू धाबीमधील शेख झायेद मशिदीत, आरामशीर, हसतमुख आणि फिकट निळ्या कुर्त्यामध्ये फिरतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर त्या पोस्टवरून राजकीय चर्चा सुरू झाल्या.अबू धाबीच्या ‘शेख झायेद’ मशिदीवरील संगमरवरी घुमट हे मोगल वास्तुकलेचे प्रतीक आहे यामध्ये नाजूक असे कोरीव काम केले आहे. या मशिदीवरील घुमटाला भव्यतेचे प्रतीक  मानले जाते. मिळालेल्या माहितीनुसार ही मशीद बांधण्यासाठी कारागीर आणि संगमरवरी दगड देखील राजस्थानमधील मकराना गावातून आणण्यात आहे होते. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी १० दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या शेवटी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. गेल्या १०  वर्षातील पटनायक यांचा हा पहीला परदेश दौरा होता. पटनायक यांना इतिहास आणि वारसा याविषयी प्रचंड आस्था आणि आवड असल्याचे त्यांच्या या दौऱ्यावरून स्पष्ट होते.

ते ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’च्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.त्यांनी पोस्ट केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये आधुनिक काळातील वास्तुशिल्प कलेचे त्यांनी कौतुक केले आहे. २२ जून रोजी ओडीसाचे मुख्यमंतत्री नवीन पटनायक यांनी व्हॅटिकन सिटीमध्ये पोप यांची भेट घेतली आणि या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती. “व्हॅटिकन सिटीमध्ये ‘पोप फ्रान्सिस’ यांना भेटून आपल्याला खूप आनंद झाला आहे. पोप यांनी भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल पटनायक यांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो” असे पटनायक यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

पटनायक यांची पोप यांच्यासोबतच्या भेटीची चांगलीच प्रसिद्धी करण्यात आली होती. या भेटीची माहिती सोशल मीडियावर टाकण्यात आली होती. पोप यांच्या भेटीची जास्तीत जास्त चर्चा कशी होईल याची काळजी घेतली गेली होती. भेटीची प्रत्येक माहिती सार्वजनिक करण्यात येत होती.  याउलट अबू धाबीमधील मशिदीला भेटीची माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली गेली होती. पटनायक यांनी अबुधाबी येथील मशिदीला दिलेल्या भेटीची माहिती ही प्रत्यक्ष भेटीच्या नंतर उघड झाली होती.