navjot singh sidhu ready for another comeback punjab congress and politics ssa 97 | Loksatta

नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगातून बाहेर येत पंजाबच्या राजकारणात सक्रीय होण्याच्या तयारीत, पण…

मार्च महिन्यापासून नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगात आहेत.

नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगातून बाहेर येत पंजाबच्या राजकारणात सक्रीय होण्याच्या तयारीत, पण…
नवज्योत सिंग सिद्धू ( इंडियन एक्स्प्रेस छायाचित्र )

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांची दोन महिन्यांत जेलमधून सुटका होणार आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. १९८८ सालच्या रोड रेज प्रकरणात ही शिक्षा न्यायालयाने सुनावलेली. मात्र, आता नवज्योत सिंग सिद्धू यांची सुटका होणार असल्याने पंजाब काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पतियाळा येथे २७ डिसेंबर १९८८ रोजी दुपारी किरकोळ वादातून नवज्योत सिंग सिद्धू (२५) यांनी गुरनाम सिंग यांच्या डोक्यात ठोसा मारला होता. त्या दिवशी संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या मार्केटमध्ये गेले होते तेव्हा हा वाद झाला. ही जागा त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर होती. या मार्केटमध्ये कार पार्कींगवरून ६५ वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी सिद्धू यांचा वाद झाला होता.

यानंतर हा वाद इतका वाढला की हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंग यांना धक्काबुक्की करून खाली पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्याच दिवशी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर यांच्याविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०२२ मध्ये एक वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण, दोन महिने आधीच नवज्योत सिंग सिद्धू यांची सुटका होणार आहे.

हेही वाचा : मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांकडून भाजपाचा प्रचार, काँग्रेस ECकडे करणार तक्रार

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी अलिकडेच सिद्ध यांना जेलमध्ये एक पत्र पाठवले होतं. त्या वृत्तामुळे पंजाब काँग्रसेच्या काही नेत्यांमध्ये अस्वस्थता परसली होती. सिद्धू यांना जेलमधून सुटकेनंतर पक्षात महत्वाची पद देण्यात येणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे. तसे संकेत सिद्धू यांचे माध्यम सल्लागार सुरिंदर डल्ला यांनी दिलं होतं. “सिद्धू तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लोकसभा मिशन २०२४ साठी तयारी सुरु करण्यात येईल. पंजाबच्या हक्कांसाठी लढा सुरु करण्यात येणार आहे. पंजाबचे सरकार बदलण्याची गरज आहे,” असे सुरिंदर डल्ला यांनी म्हटलं होतं.

सिद्धू यांच्या एका सहकाऱ्यांने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं की, “२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उतरण्याची सिद्धू यांची कोणतीही इच्छा नाही. पण, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील.”

काँग्रेस नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, “सिद्धू हे पूर्णपणे बदलले आहेत. सिद्धूंमुळे विरोधी पक्ष मजबूत होईल. पक्षाला खंबीर नेत्याची गरज आहे. सध्या पंजाबची अवस्था वाईट आहे. त्यामुळे सरकारलाही सिद्धू यांच्यासारख्या विरोधकांची गरज आहे.”

हेही वाचा : काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानमध्ये दाखल, गेहलोत-पायलट वाद मिटणार? राहुल गांधीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

दुसऱ्या एका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने म्हटलं, “सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यावर काय केल? काँग्रेसचे पुन्हा सरकार आलं असते. पण, सिद्धू हे तत्कालीन सरकारलाच विरोध करत होते. सिद्धू अजूनही बदललेले नाहीत. ते तुरुंगात असताना काँग्रेस नेत्यांना भेटतही नव्हते. ही कोणती पद्धत आहे? तुरुगांतून बाहेर आल्यावरती काय करतील माहिती नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 21:40 IST
Next Story
काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानमध्ये दाखल, गेहलोत-पायलट वाद मिटणार? राहुल गांधीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष