नगर : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये प्रस्थापितांनी आपापले गड राखले. जिल्ह्याच्या सहकारात काँग्रेसची पिछेहाट झाली असली तरी राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. राष्ट्रवादीचे हे प्राबल्य भाजपला मोडणे शक्य झालेले नाही.

जिल्ह्यात सहकारातील निवडणुका प्रस्थापित आपली गटातटाची समीकरणे जोडत लढवत असतात. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडी असो किंवा भाजप व समविचारी असोत एखाद दुसरा अपवाद वगळता एकत्रितपणे कोठेच सामोरे गेले नाहीत. प्रस्थापितांनी आपापल्या सोयीने निवडणुका लढवत बालेकिल्ले राखले. जिल्ह्यातील १४ बाजार समितींपैकी महाविकास आघाडीकडे सात, भाजप व शिंदे गटाकडे तीन, संमिश्र निकाल असलेल्या दोन आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपा आमदार राम शिंदे यांच्या मतदारसंघातील कर्जत व जामखेड या दोन्ही ठिकाणी, दोन्ही गटांना समसमान जागा देत मतदारांनी नेत्यांनाच बुचकळ्यात पाडले आहे. या दोन्ही ठिकाणी विखे समर्थक पवार यांच्याबरोबर होते. सभापती निवडीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेतील ठाकरे व शिंदे हे गट सहकारात कुठे खिजगणतीतही नाहीत.

Congress Leader Mukul Wasnik, akola lok sabha seat, Mukul Wasnik Criticizes Modi Government, Alleges Anarchy in the country, BJP in power, lok sabha 2024, election campagin, akola news,
“भाजपच्या सत्तेत देशात अराजकता,” काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची घणाघाती टीका; म्हणाले, “पराभव दिसत असल्याने…”
wardha lok sabha constituency, sharad pawar ncp , tutari symbol, different identity, different name, vidarbha, find new solution, avoid confusion, amar kale, wardha news, wardha ncp, lok sabha 2024,
तुतारी टोचाची की फुकाची? मतदारांना पडलेला प्रश्न अन् त्यावर शोधले मग ‘हे’ उत्तर
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

हेही वाचा – “जे पेराल, तेच उगवेल”, अतिक अहमदच्या हत्येनंतर योगी आदित्यनाथ यांची प्रयागराजमध्ये पहिलीच सभा

भाजप नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (राहाता) व काँग्रेस नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (संगमनेर) या दोघांनी परस्परांच्या निवडणुकांत विशेष लक्ष घातले होते. मात्र दोघांनीही परस्परांचे आक्रमण थोपवत आपले गड राखले. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या विरोधात महाविकास आघाडीची एकजूट कायम राहिल्याने आघाडीला अकोल्यातील सत्तेचे सोपान चढता आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विखे यांनी अजित पवार-बाळासाहेब थोरात यांना धक्का दिला होता. त्याचा परिणाम श्रीरामपूरमध्ये जाणवला. बँकेत एकत्र आलेल्या राधाकृष्ण विखे-भानुदास मुरकुटे-करण ससाणे यांनी काँग्रेसचे आमदार लहू कानडे, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक व शेतकरी संघटना यांना दूर ठेवले. त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीतही जाणवेल.

अपक्ष आमदार शंकरराव गडाख (नेवासा), राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले (शेवगाव), राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (राहुरी), भाजप नेते शिवाजी कर्डिले (नगर) यांनी आपली अनेक वर्षांची सत्ता अबाधित ठेवली. राहुरीत विखे-कर्डिले यांचा लढत निर्माण करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. हा विखे यांना धक्का आहे. श्रीगोंद्यात भाजप आमदार बबनराव पाचपुते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे एकत्र येऊनही त्यांना सत्ता गमवावी लागली. तेथे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी वर्चस्व निर्माण केले.

हेही वाचा – कर्नाटकमध्ये प्रचार शिगेला! काँग्रेसकडून भाजपाविरोधात #CryPMPayCm मोहीम

पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी या दोघांनी विखे यांच्या विरोधात अनपेक्षितपणे एकत्र यश मिळवले. पारनेरमध्येही विखे यांना धक्का बसलेला आहे. पाथर्डीत भाजप आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीची सत्ता उलथून लावली. मात्र आमदार राजळे यांच्याच मतदारसंघातील शेवगावमध्ये मात्र त्या यश मिळू शकल्या नाहीत. शेवगावमध्ये त्यांनी घुले यांच्या विरोधात विरोधकांची एकजूट निर्माण करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे-भाजप माजी आमदार स्नेहलता कोल्हे-विखे यांचे मेहुणे राजेश परजणे-ठाकरे गटाचे नितीन औताडे यांच्या सहमती एक्सप्रेसने सत्ता कायम राखली.