राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा असली तरी हा मतदारसंघ भाजप पटेल यांच्यासाठी सोडणार का? यावरच पटेल यांचे भवितव्य अवलंबून असेल.

राष्ट्रवादीतील फुटीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची महत्त्वाची भूमिका बजाविली होती. वास्तविक पटेल हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात असत. शरद पवार यांचे उजवे हात अशीच त्यांची राजकीय वर्तुळात ओळख होती. पण राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी करावी का, या मुद्द्यावर उभयतांमध्ये बिनसले. पटेल हे सुरुवातीपासूनच भाजपबरोबर जाण्याच्या मताचे होते. शरद पवार यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्यास नकार दिला. यावरून शरद पवार आणि पटेल ही जोडी फुटली. सध्या पटेल हे अजित पवार यांचे निकटवर्तीय ओळखले जातात. शरद पवार आणि अजित पवार गटात सध्या कायदेशीर लढाई सुरू असून, त्यात अजित पवार गटाच्या वतीने पटेल हे किल्ला लढवत आहेत.

Devendra Fadnavis
“आम्हाला आमची मते मिळाली, पण महाविकास आघाडीची… ”; विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Pankaja Munde
विधान परिषदेनंतर पंकजा मुंडेंना आता मंत्रिपदही मिळणार? स्वतः प्रतिक्रिया देत म्हणाल्या…
Legislation in the current session on paper shredding
पेपरफुटीबाबतचा चालू अधिवेशनात कायदा; लोकसेवा आयोगाकडून ‘क’ वर्गाच्या जागांची भरती
eknath shinde and ajit pawar
महायुक्तीचा संकल्प! अजितदादांच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांचा हात; सर्व समाजघटकांसाठी घोषणांचा वर्षाव
ambadas danve on vishwajit kadam
विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा विषय…”
bhagwat karad marathi news
“काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार”, भागवत कराड यांचा आरोप; म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था…”
anti-smart meter movement will intensify in the district of Energy Minister Devendra Fadnavis
ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातच स्मार्ट मीटरविरोधी आंदोलन तीव्र होणार… उद्या ठरणार पुढची दिशा…
Bhupendra Yadav BJP state in-charge for assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी भूपेंद्र यादव भाजपचे राज्य प्रभारी; अश्विनी वैष्णव सहप्रभारीपदी

हेही वाचा… अलिबाग विधानसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा? शिंदे गटावर कुरघोडीचा प्रयत्न

भाजपशी हातमिळवणी केल्यापासून प्रफुल्ल पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा सुरू झाली. पण लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली आहे. पटेल यांची आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. यापूर्वी त्यांनी चार वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरण्याची त्यांचा मानस आहे. पण सध्या या मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे हे खासदार आहेत. म्हणजेच पटेल यांची निवडणूक लढण्याची इच्छा पूर्ण करायची असल्यास भाजपला आधी हा मतदारसंघ सोडावा लागेल. भाजपला हक्काच्या जागेवर पाणी सोडावे लागेल. पटेल हे राज्यसभेचे खासदार असून, गेल्याच वर्षी त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली होती. त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत ही २०२८ पर्यंत आहे. यामुळेच पटेल यांना लोकसभेसाठी भाजपने मतदारसंघ सोडला नाही तरी ते राज्यसभेचे सदस्य आहेत.

भाजपला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीसाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. शिवसेनेचे गेल्या वेळी १८ खासदार निवडून आले होते. या सर्व जागांवर शिंदे गटाचा दावा आहे. राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. लोकसभेच्या पाच ते सहा जागा मिळाव्यात, असा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी भंडारा-गोंदिया जागा सोडण्याचा निर्णय हा दिल्लीच्या पातळीवर होईल. यामुळे राज्य भाजप नेत्यांनी मौन बाळगणेच पसंत केले आहे.