Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या विविध भागात सभा सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच काही पक्षांकडून राज्यातील जनतेला मोठंमोठी आश्वासने दिली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

त्यामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई, ओबीसी, मराठा आरक्षण, महाराष्ट्रातील उद्योग गुजरात राज्यात गेले, यासह आदी विषयांवर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं. दरम्यान, जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा-कळव्यातून निवडणूक लढवत आहेत. २००९ पासून ते सलग तीन वेळा मुस्लिम बहुल मतदारसंघातून विजयी होत आहेत. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार नजीब मुल्ला हे निवडणूक लढवत आहेत. जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीचे (SP) अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखलं जातं.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!

हेही वाचा : Shirala Assembly Constituency : शिराळ्यात जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक

महाराष्ट्रातील आगामी निवडणुका या २०१९ च्या निवडणुकांपेक्षा वेगळ्या आहेत. दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली. शिवसेना (UBT) आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) हे एकत्र आहेत. यावेळीही मतदानाची पद्धत वेगळी असेल असे वाटते का? या प्रश्नावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, निवडणुका येतात आणि जातात. मग राज्यात राजकीय पक्षांची संख्या वाढली किंवा घटली याने काही फरक पडत नाही. लोक काय विचार करतात हे महत्त्वाचं आहे. गुजरातमुळे आपण (महाराष्ट्र) अनेक उद्योग गमावले आहेत. आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेची काय अवस्था आहे? बेरोजगारी आणि महागाई सर्वकालीन उच्चांकावर आहे. आपल्या सामाजिक न्याय खात्याने सर्वस्व गमावलं आहे. वंचित घटकांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. हे निवडणुकीचे मुद्दे आहेत, असं ते म्हणाले.

२०१९ मध्ये तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुलनेत आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष यावेळी कमी जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे पक्षाची व्याप्ती कमी होईल, असे वाटत नाही का? या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, प्रत्येक निवडणुकीत संदर्भ बदलत असतात. भारताच्या युती आणि आघाडीच्या राजकारणातील सर्वात अनुभवी व्यक्ती म्हणजे शरद पवार आहेत. त्यांनी आम्हाला जास्त जागा न मागण्याचा सल्ला दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपादरम्यान वादविवाद पाहायला मिळाले. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्येही काही जागांवरून मतभेद होते, अशी चर्चा होती? यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की, खरं तर निवडणुकीसाठी जागावाटप हे नेहमीच गुंतागुंतीचे असते. पण मला आता याबाबत जास्त काही बोलायचं नाही, असं त्यांनी म्हटलं. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष जागावाटपाबाबत समाधानी आहेत का? असं विचारलं असता ते म्हणाले, साहजिकच आणि म्हणूनच मान्यता देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हरियाणात जाट समुदाय सर्वात महत्त्वाचा मानला जातो. भारतीय जनता पक्षाला त्यांची मदत मिळाल्याचं बोललं जातं. यासंदर्भात काँग्रेस नेते उघडपणे बोललेही आहेत. मग आता महाराष्ट्रात मराठ्यांच्या बाबतीत असे घडेल असे वाटते का? या प्रश्नावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आम्ही जातीचे राजकारण करत नाही. मी ओबीसी आहे. या महायुती सरकारने फक्त आश्वासने दिली आणि ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. महायुतीने समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण राज्यात हेच घडत आहे. आता केंद्र सरकारच्या मान्यतेशिवाय ते आरक्षण देऊ शकत नाहीत आणि त्यांना हे माहिती आहे. मात्र, सत्तेसाठी त्यांनी हे सर्व केलं, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. त्याचा परिणाम होईल असे वाटते का? यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी त्यांचा (जरंगे पाटील) प्रवक्ता नाही. काय करायचे ते जनता ठरवेल. जनता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या विरोधात मतदान करेल. कारण जनता त्रस्त आहे हे या निवडणुकीत दिसेल. या सरकारच्या काळात केवळ ठेकेदारांनाच नफा मिळत आहे. मला माहित नाही ५० टक्के कमिशन कुठे जातं? हे कंत्राटदारांचे सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : Kolhapur Assembly Election 2024 : कोल्हापूरमधील काँग्रेसच्या माघारनाट्याने निकालाची समीकरणे बदलणार ?

मुस्लिमांना तिकीट वाटपाबाबतही वाद सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने तुमच्या पक्षापेक्षा मुस्लिमांना जास्त तिकिटे दिली आहेत. समाजाची मते विभागली जातील असे वाटते का? यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, जेव्हा तुमचा मित्रपक्ष भाजपा म्हणतो की ते मशिदींमध्ये घुसतील आणि लोकांवर हल्ले करतील, तेव्हा तुमची (राष्ट्रवादीची) मुस्लिमांबाबत भूमिका काय आहे? त्यांनी (अजित पवार) कधी मुस्लिमांसाठी भूमिका घेतली होती का? सेक्युलॅरिझम म्हणजे तुम्ही काय म्हणता यावर नसून तुम्ही काय करता यावर आहे. तुमचे चारित्र्य नेहमीच मुस्लिमविरोधी, दलितविरोधी आणि ओबीसीविरोधी राहिले आहे. जातीय राजकारणाचा आपल्या राज्याला फायदा होणार नाही. सर्वात जास्त सामाजिक सुधारणा करणारा हा समाज आहे. आमची युती हेतूपूर्ण आहे तर त्यांची सत्ता मिळविण्यासाठी संधीसाधू आहे. नवाब मलिक हे भाजपाचे कसे टार्गेट आहेत हे तुम्ही पाहिलेच असेल. यावरून त्यांच्या युतीचा खरा रंग दिसून येतो, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर केला.

हरियाणा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचे श्रेय त्यांच्या काही बंडखोर उमेदवारांवर फोडण्यात येत आहे. महाराष्ट्रातही असेच काही पाहायला मिळेल असे वाटते का? यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, हरियाणात मतदारसंघ लहान होते आणि मतदारही कमी होते. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कशी बदलली हे आपण सर्वांनी पाहिले. ईव्हीएममध्ये इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर असताना हे कसे घडले? हे कसे वाढू शकते? तुम्ही कॅल्क्युलेटर घ्या आणि काही आकडेमोड करा, एका आठवड्यानंतर ते बदलेल का?, असा सवालही यावेळी त्यांनी केला.

Story img Loader