Never again alliance with Nitish Kumar resolution passed by Bihar BJP executive msr 87 | "परत कधीच नितीश कुमारांबरोबर आघाडी केली जाणार नाही" बिहार भाजपाच्या कार्यकारिणीकडून ठराव मंजूर | Loksatta

“परत कधीच नितीश कुमारांबरोबर आघाडी केली जाणार नाही” बिहार भाजपाच्या कार्यकारिणीकडून ठराव मंजूर

“भाजपा आणि जनादेशाचा वारंवार विश्वासघात करणारे नितीश कुमार बिहारच्या राजकारणात ओझं बनले आहेत.” असंही सुशील कुमार मोदीं म्हणाले आहेत.

Nitish kumar and Sushil Kumar Modi
(फोटो लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

Bihar Politics: बिहारमधील दरभंगा येथे दोनदिवसीय बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या बिहार यूनिटने रविवारी जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार यांच्यासोबत परत कधीच आघाडी न करण्याचा ठराव मंजूर केला. राज्यसभा खासदार आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी ठरावास दुजोरा देत म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय भाजपा नेतृत्वाने निर्णय घेतला आहे की, भाजपा परत कधीच नितीश कुमारांसोबत आघाडी करणार नाही.”

सुशील मोदी यांनी हेही सांगितले की, “भाजपा आणि जनादेशाचा वारंवार विश्वासघात करणारे नितीश कुमार बिहारच्या राजकारणात ओझं बनले आहेत. त्यांच्याकडे जनाधार नाही आणि मत मिळवण्याची क्षमता. त्यांची कुवत आता विधासभेत १०-१५ जागा जिंकण्याचीही राहिलेली नाही.”

“जदयूला २०२०च्या विधानसभा निवडणुकीत ४३ जागा यामुळे जिंकता आल्या, कारण भाजपाने आपली संपूर्ण ताकद लावली होती. पंतप्रधान मोदी स्वत: बिहारमध्ये येऊन प्रचार करत होते. पंतप्रधान मोदींनी नितीश कुमारांसाठी मतं मागितली नसती, तर स्वबळावर त्यांच्या पक्ष लोकसभेच्या १५ नाही केवळ दोन जागाच जिंकला असता. भाजपा आता राजकीय ओझं मुक्त झाल्याचा अनुभव घेत आहे आणि आनंदी आहे की ते सोडून गेले. आता भाजपा स्वत:च्या बळावर २०२५ मध्ये बिहारमध्ये सरकार बनवेल.” असंही सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 19:45 IST
Next Story
७० वाहने, ३ बंदूका अन् शनि शिंगणापूरला १ कोटी रुपयांचं दान; गोळीबारात मृत्यू झालेले नाबा किशोर दास कोण होते?