नुपूर शर्मा या नेहमीच चर्चेत राहिलेल्या आहेत. रविवारी भाजपाने आपल्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वादचर्चेत नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपाने निलंबनाची कारवाई केली. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या आठवडाभरानंतर ही कारवाई करण्यात आली. नुपूर शर्मा आणि हकालपट्टी करण्यात आलेले दिल्ली भाजपाचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांच्या वक्तव्यांमुळे भारताला अरब देशांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केलं आहे.

भाजपाने या वादापासून अंतर ठेवलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी “धर्माबद्दल पक्षाला आदर असून, कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अवमान करणं पक्षाला मान्य नाही”, असं स्पष्टीकरण दिलं आहे. “भाजपा असे लोक आणि विचारसरणीला प्रोत्साहन देत नाही,” असंही भाजपाने सांगितलं आहे.

Former Shiv Sena MLA Mahadev Babar announced support for independent candidate Gangadhar Badhe
हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मोठा निर्णय ! महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांंच्या अडचणी वाढल्या
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
uddhav thackeray replied to devendra fadnavis dharmayudhha criticism
“आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?

ट्विटरला नुपूर शर्मा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गिरीराज सिंग, भुपेंद्र यादव फॉलो करतात. याशिवाय फॉलो करणाऱ्यांमध्ये भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय, खासदार मनोज तिवारी, गौतम गंभीर, परवेश वर्मा, दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांचाही समावेश आहे.

रझा अकादमीचे मुंबईतील सहसचिव इरफान शेख यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईत २८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वादचर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. नुपूर शर्मा यांनी मात्र आपण कोणतंही आक्षेपार्ह किंवा चुकीचं विधान केलं नसल्याचा दावा केला होता. दरम्यान या वादानंतर आपल्याला बलात्कार तसंच हत्येच्या धमक्या मिळत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

३७ वर्षीय नुपूर शर्मा दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवीधर असून त्यांनी कायद्याचं शिक्षणही घेतलं आहे. यासोबत त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कायद्यात मास्टर्स डिग्री घेतली आहे.

विद्यार्थी नेता म्हणून नुपूर शर्मा यांनी राजकारणात पाऊल टाकलं. २००८ मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचं अध्यक्षपद मिळवलं. त्यावेळी विद्यापीठांमध्ये काँग्रेसची विद्यार्थी शाखा नॅशनल स्टुडंट्स युनियन (NSUI) मजबूत स्थितीत होती. मात्र अशावेळीही नुपूर यांनी अध्यक्षपद जिंकलं होतं. इतर सर्व जागा नॅशनल स्टुडंट्स युनियनने जिंकल्या होत्या.

नुपूर शर्मांच्या राजकीय वाटचालीत २०१५ दिल्ली विधानसभा निवडणूक सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरली होती. यावेळी नुपूर शर्मांनी थेट आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना लढत दिली होती. नवी दिल्लीतील मतदारसंघात झालेल्या या लढतीत नुपूर शर्मा यांचा ३१ हजार ५८३ मतांनी पराभव झाला होता.

पक्षाच्या युथ विंग तसंच युवा मोर्चाचा प्रमुख चेहरा राहिलेल्या नुपूर शर्मा यांनी पक्षात अनेक महत्वाची पदं सांभाळली आहेत. नुपूर शर्मा युवा शाखेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि दिल्ली राज्य कार्यकारिणीच्या सदस्या होत्या, २०१७ मध्ये प्रदेशाध्य़क्ष मनोज तिवारी यांनी आपली टीम तयार केली असता त्यामध्ये नुपूर शर्मा यांच्याकडे दिल्ली भाजपाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

“दिल्ली टीमचा भाग असतानाही कायदेशीर ज्ञान, कुशाग्र बुद्धिमत्ता, राष्ट्रीय घडामोडींवरील ज्ञान आणि द्विभाषिक कौशल्यांमुळे त्यांना टीव्हीवर राष्ट्रीय मुद्द्यांवरील चर्चेसाठीदेखील पाठवण्यात येत होतं,” अशी माहिती वरिष्ठ भाजपा नेत्याने दिली आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये जेव्हा जे पी नड्डा यांनी आपली टीम तयार केली तेव्हा त्यात नुपूर शर्मा यांना राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. “अनेकदा त्यांनी सीमा ओलांडली होती. पण टीव्ही चर्चेत सहभागी होणाऱ्या अनेकांसोबत असं होत असतं. हेच त्या मंचाचं स्वरुप आहे,” असं भाजपा नेत्याने म्हटलं आहे. एप्रिल २०१९ मध्ये, आझम खान यांच्यावरील चर्चेदरम्यान झालेल्या जोरदार वादामुळे नुपूर शर्मा यांनी पॅनेलमधील एका सदस्याचं नाव घेतलं होतं.

नुकत्याच झालेल्या वादावर बोलताना नुपूर शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं होतं की, “सोशल मीडियावर उपलब्ध असणारे हे सर्व संपादित केलेले व्हिडीओ आहेत. आणखी एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये मला मुर्ख, अश्लील म्हणण्यात आलं. मी सुप्रीम कोर्टाला अंतिम निर्णय घेण्याची विनंती करते. आपण सभ्यपणे चर्चा करणार आहोत की शरिया कायदे लागू करण्यास परवानगी देणार आहोत?”.

रविवारी नुपूर शर्मा यांनी बिनशर्त आपलं वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं. तसंच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असंही सांगितलं.