धामनगर पोटनिवडणुकीत भाजपाच्या सूर्यवंशी सूरज यांनी सत्ताधारी बिजू जनता दलाच्या अंबाती दास यांचा पराभव केल्यानंतर भाजपामध्ये उत्साह संचारला आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपाने आपले संपूर्ण लक्ष आता पदमपूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीवर केंद्रीत केले आहे. त्यामुळे या एका जागेसाठी ओडिशात राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे या जागेवर वर्ष २००० नंतर बीजेडीचा एकदाही पराभाव झालेला नाही.

हेही वाचा – राजीव गांधी हत्या प्रकरण: दोषींच्या सुटकेचे तामिळनाडूच्या राजकारणात पडसाद का उमटले नाहीत?

narayan rane vs vinayak raut
समाजवादाकडून हिंदुत्वाकडे झुकलेल्या तळकोकणात रंगतदार सामन्याची प्रतीक्षा… राणे वर्चस्व राखणार की राऊत हॅटट्रिक करणार?
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…
bjp 14 seat loksabha up
‘अब की बार, ४०० पार’चे लक्ष्य गाठण्यासाठी उत्तरप्रदेशमध्ये ‘या’ १४ जागांवर भाजपाचे विशेष लक्ष

ऑक्टोबरमध्ये बीजेडी आमदार बिजय रंजन सिंह बरिहा यांच्या निधनानंतरही बारगढ जिल्ह्यातील पदमपूर ही जागा रिक्त झाली होती. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिजय रंजन सिंह बरिहा यांनी भाजपाचे उमेदवार प्रदीप पुरोहित यांचा पराभव केला होता. बिजय रंजन सिंह बरिहा यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने पुन्हा प्रदीप पुरोहित यांना उमेदवारी दिली आहे. यंदा या जागेवर भाजपाचा विजय होईल, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – Gujarat Election: “ शासकीय कार्यालयांमधील मोदींचे फोटो काढा किंवा झाका”; ‘आप’ची निवडणूक आयोगाकडे मागणी

भाजपाचे उमेदवार प्रदीप पुरोहित यांच्याविरोधात बिजेडीने बरिहा यांची मुलगी बरशा सिंग बरिहा यांना उमेदवारी दिली आहे. २९ वर्षीय बरशा सिंग बरिहा यांची ही पहिलीच निवडणूक आहे. तर काँग्रेसने माजी आमदार सत्यभूषण साहू यांना उमेदवारी दिली आहे.

पश्चिम ओडिशातील पदमपूर मतदारसंघात भाजपाला अंतर्गत गटबाजीचाही सामना करावा लागतो आहे. मात्र, मतभेद बाजुला ठेऊन आम्ही बीजेडीविरुद्ध एकजुटीने लढू असा विश्वास भाजपा उमेदवार प्रदीप पुरोहित यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना ते म्हणाले, “धामनगरमध्ये मिळालेल्या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. जर धामनगरमध्ये बीजेडीचा पराभव होऊ शकतो, तर पदमपूरमध्येही पराभव होऊ शकतो. यावेळी जनता, शेतकरी सत्ताधाऱ्यांना चोख उत्तर देतील”

हेही वाचा – तीन दशकांपासून भाजपाचा आमदार, गुजरात दंगलीची झळ सोसलेल्या ‘नरोडा’ जागेवर यावेळी कोण जिंकणार?

दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी बीजेडीकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. बीजेडीने काही वर्षांपूर्वी ज्या पदाधिकाऱ्यांना बाजुला सारले होते, त्यांना पुन्हा जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या मंत्रीमंडळातील सहा मंत्री आणि अनेक आमदारही पदपूरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे पदमपूरमध्ये नेमकं कोण बाजी मारतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.