राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : भारत जोडो यात्रेने इतिहास रचला. महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा वारसा जपणारे दोघे महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतु राहुल गांधी हे दोघे शुक्रवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. देशाचे संविधान व लोकशाहीवर हुकुमशाही सरकार घाला घालत असले तरी आम्ही लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी हातात हाथ घालून निघालो आहोत, असा संदेशच गांधी-नेहरू यांनी दिली.

हेही वाचा… राहुल यांच्या शेगाव सभेसाठी विदर्भातून कार्यकर्त्यांचे जत्थे

हेही वाचा… घराणेशाही करणाऱ्या खडसे-महाजनांमध्ये घराणेशाहीवरून कलगीतुरा

देशात जेव्हा इंग्रज सत्तेची हुकमशाही राजवट अत्याचार करत होती तेंव्हा जनतेचा आवाज बुलंद करत गांधी – नेहरू रस्त्यावर उतरले होते. स्वातंत्र्याच्या लढ्याचा जाज्वल्य इतिहास आज महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील हजारो लोकांनी पुन्हा अनुभवला. राहुल गांधी व तुषार गांधी भाजपाच्या हुकुमशाही राजवटीविरोधात जनतेचा आवाज बुलंद करत आज रस्त्यावर उतरले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of bharat jodo yatra once again gandhi nehru walked on the street once again together print politics news asj
First published on: 18-11-2022 at 18:18 IST