अविनाश कवठेकर

पुणे : काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या पुणे फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे नेते शुक्रवारी उपस्थित राहणार आहेत. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून काँग्रेसने ‘दूर लोटलेले’ तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी भारतीय जनता पक्षाबरोबरच ‘जवळीक’ साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
Wardha, complaint of Ramdas Tadas
वर्धा : बनावट व्हिडीओ प्रसारित करणे भोवले, रामदास तडस यांच्या तक्रारीवरून काँग्रेसच्या अ‍ॅडमीनवर गुन्हे दाखल

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे उद् घाटन होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह स्थानिक भाजप नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत. पुणे फेस्टिव्हलच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच भाजप नेत्यांच्या हस्ते आणि उपस्थितीत फेस्टिव्हलचे उद् घाटन होणार असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचवल्या आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live 2 September : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

एकेकाळी पुण्याचे एकहाती नेतृत्व करणाऱ्या तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हल सुरू केला. तेव्हापासून पुणे फेस्टिव्हलचे उद् घाटन कायम काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्तेच झाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यात कलमाडी यांचे नाव आल्यानंतर त्यांना शिक्षा झाली आणि काँग्रेसनेही त्यांना दूर केले होते. यंदा मात्र पुणे फेस्टिव्हलच्या उद् घाटनाला भाजप नेत्यांना कलमाडी यांनी निमंत्रित केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पुणे फेस्टिव्हल आयोजनाच्या दृष्टीने सुरेश कलमाडी काही दिवसांपूर्वी महापालिकेत दाखल झाले होते. तेंव्हापासून ते शहराच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यात भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फेस्टिव्हलसाठी निमंत्रित करून कलमाडी भाजपबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीही कलमाडी भाजपमध्ये प्रवेश करतील, असे बोलले जात होते. भारतीय जनता पक्षाकडून कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. मात्र आता कलमाडी यांच्याच कार्यक्रमाला भाजप नेते उपस्थित राहणार असल्याने त्याबाबतही तर्क-वितर्क लढविले जात आहेत.