लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना ही आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला राजकीय लाभासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने रक्षाबंधनाचे मुहूर्त साधत भाजप आणि शिंदे गटात प्रचारासाठी चढाओढ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून फलकबाजी व अन्य माध्यमांमधूनही योजनेचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे.

Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Chandrasekhar Bawankule
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी भाजप सज्ज; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
Congress leaders in Nagpur claimed that state president Nana Patole will be the next chief minister
“पुढचा मुख्यमंत्री विदर्भातीलच,” काँग्रेस नेत्यांचा नाना पटोलेंच्या नावावर…
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
eknath shinde on one nation one election
CM Eknath Shinde : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या निर्णयामुळे…”
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
mahayuti will contest assembly elections under the leadership of cm eknath shinde says ajit pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक; अजित पवार यांची माहिती

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा इच्छुक असून भाजपचे मुरजी पटेल हेही निवडणुकीची तयारी करीत आहेत. शर्मा यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत तर पटेल यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचे दोन स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल अभिनंदन करण्यासाठी फडणवीस यांना भाजप महिला मोर्चाच्या पुढाकाराने २५ लाख राख्या पाठविण्यात येत आहेत. भाजप व शिंदे गटातील आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी विविध कार्यक्रम, माहिती पुस्तिका आणि फलक लावण्यात येत आहेत. अनेक भागांमध्ये घरोघरी राख्याही पाठविण्यात येत आहेत. या योजनेचा जोरदार प्रचार करून निवडणुकीत राजकीय लाभ उठविण्यासाठी भाजप-शिंदे गट प्रयत्नशील आहे.

हेही वाचा >>>Champai Soren : झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का? माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपाच्या वाटेवर?

योजनेची मुदत काढून टाकण्याची मागणी

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठीचे अर्ज भरताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने योजनेसाठीची ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत काढून टाकण्याची मागणी माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. योजनेसाठी सुरुवातीला १५ जुलैची मुदत होती. मुदत वाढविण्याची मागणी आम्ही केल्यावर ही मुदत ३१ ऑगस्ट करण्यात आली. महिलांसाठी सामाजिक सुरक्षा हक्क देणारी ही योजना असल्याने अर्ज करण्याची मुदत काढून टाकावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.