Odisha train accident latest news : ओडिशामध्ये शुक्रवारी रात्री (दि. २ जून) तीन रेल्वेची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामधील मृतांना सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जात असतानाच आता विरोधकांकडून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. रेल्वेच्या सदोष सिग्नल यंत्रणेमुळे एवढा मोठा अपघात झाला, असा आरोपही विरोधकांकडून होत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जवळपास २८० लोकांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक प्रवाशी जखमी आहेत. बालासोर जिल्र्ह्यात कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन भीषण रेल्वे अपघात झाला. १९९९ नंतरचा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे.
तृणमूल काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी
तृणमूल काँग्रेस
या दुर्दैवी अपघातात ज्यांचा दुःखद मृत्यू झाला त्यांना मी अंतकरणापासून श्रद्धांजली वाहतो. जे जखमी आहेत, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो आणि रेल्वेमंत्र्यांमध्ये जराही विवेक जागा असेल तर त्यांनी तात्काळा राजीनामा द्यावा, अशी पोस्ट बॅनर्जी यांनी फेसबुकवर लिहिली आहे.
अभिषेक बॅनर्जी यांच्या सूरात सूर मिळवत तृणमूलचे प्रवक्ते साकेत गोखले यांनीही अशीच प्रतक्रिया दिली आहे. “ज्या कुटुंबांची या अपघातामुळे हानी झाली, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे या तीन रेल्वे एकमेकांवर धडकल्या असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाली आहेत, ज्याची उत्तरे मिळायला हवीत.”, असे ट्विट गोखले यांनी केले आहे.
सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य हवे
ओडिशातील रेल्वे अपघात भयानक असून रेल्वे मार्गाचा विचार करता सुरक्षा व्यवस्थेला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले पाहीजे. या अपघातामुळे अनेक विधायक प्रश्न निर्माण झाले आहेत, असे ट्विट काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.