सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर: एमआयएम ही भाजपला मदत करणारा पक्ष आहे. या दोन्ही पक्षांनी मिळून छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल घडविण्याचा डाव होता आणि आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबदास दानवे यांनी केला. महाविकास आघाडीची जिल्हास्तरावरील बांधणी करण्यासाठी आयोजित ‘ वज्रमूठ’ सभा २ एप्रिल रोजी होणार असून त्याच्या तयारीच्या सभेत ते बोलत होते. लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठीची ही वज्रमूठ असल्याने ही सभा राज्यातील सर्वात मोठी सभा होईल असे नियोजन करण्यात आले असल्याचे दानवे म्हणाले.

आता ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नाव झाले आहे. त्यांनी केलेले आंदोलन तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो अशा स्वरुपाचे होते. भाजपला मदत करण्यासाठीच ‘ एमआयएम’चा उदय झाला. खरे तर बेरोजगारी ही समस्या आहे. त्याऐवजी दंगल घडवून आणण्याचा डाव होता. पण आता मुस्लिम भागात जाऊन त्याचेही मनोधैर्य वाढवायला हवे ते म्हणाले. सभेत उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण भाषणा दरम्यान छत्रपती संभाजीनगर म्हणण्याऐवजी औरंगाबाद असा उल्लेख केला व त्यांना उपस्थित कार्यकर्त्यांनी हे लक्षात आणून दिले.

हेही वाचा >>> राजकीय पाठशिवणीचा खेळ पुन्हा नव्याने, महाविकास आघाडीच्या सभेनंतर शिवसेनेची धनुष्यबाण यात्रा

गेली कित्येक दिवस तुम्ही ‘ संभाजीनगर’ असा उल्लेख करत आहात. आम्ही आता दीड महिना झाल्याने चुकून झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर ‘ जरा दम धरा’ तेही संभाजीनगरच म्हणतील, असे दानवे म्हणाले. सभेच्या तयारीसाठी पहाटेपासून संपर्क करणार असल्याचे सांगून दानवे यांनी सभेला या असा निरोप देण्यासाठी ‘ मुस्लिम संख्या अधिक असणाऱ्या रोशन गेट भागातही जाऊ असे सांगितले. शिवसेनेचे हिंदूत्व हे मुस्लिमांना शिव्या देणारे , पाण्यात पाहणारे नाही. त्यामुळे तेही या वज्रमूठ सभेला येतील असे दानवे म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leader ambadas danve accuses bjp and mim of plotting riots in chhatrapati sambhajinagar print politics news ysh
First published on: 26-03-2023 at 19:54 IST