मुंबई : केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या वतीने मंगळवारपासून मुंबईत दोन दिवसीय ई गव्हर्नन्स परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या २७ व्या राष्ट्रीय परिषदेत ‘विकसित व सुरक्षित भारत आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावर विचारविनिमय करण्यात येणार आहे.

२८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांचे एक हजार प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रशासकीय सुधारणा विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास व राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंग, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे.

Non creamy layer income limit
‘नॉन क्रीमीलेअर’ उत्पन्न मर्यादा १५ लाख? केंद्राला शिफारस ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज प्रस्ताव
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
nashik postman rally
टपाल दिन फेरीत ‘हरकारा’, ‘ब्रिटिशकालीन पोस्टमन’ आकर्षण
Nagpur double decker bridge
वरती मेट्रो, खाली रेल्वे, मध्ये रस्ता अन् आणखी बरेच काही…देशातील पहिला उड्डाणपूल
big decision of Modi government, agriculture sector,
कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय जाणून घ्या, तिन्ही योजनांची सविस्तर माहिती
MPSC Agricultural Services, MPSC, court order,
‘एमपीएससी’ कृषी सेवा: न्यायालयाच्या आदेशानंतरही नियुक्ती देण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ?
what is quad grouping
QUAD संघटना नेमकी काय आहे? भारतासाठी या संघटनेचे महत्त्व काय?
selected for the post of MPSC exam passed officer the job of security guard has to be done
एमपीएससी’तून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदावर निवड होऊनही करावे लागते सुरक्षा रक्षक, रिक्षा चालकाचे काम

हेही वाचा >>>RSS चे जातनिहाय जनगणनेला समर्थनाचे संकेत, पण…

१६ अनुकरणीय उपक्रमांना पुरस्कार

या परिषदेत १६ अनुकरणीय उपक्रमांना ई-गव्हर्नन्स २०२४ चे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. केंद्र, राज्य, जिल्हा आणि शैक्षणिक व संशोधन संस्थांना देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांमध्ये ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि १ ज्युरी पुरस्कारांचा समावेश आहे.