scorecardresearch

गुलाम नबी आझादांना झटका! पक्षाचे ३० संस्थापक सदस्य काँग्रेसमध्ये

गुलाम नबी आझादांना पक्षाचे ३० सदस्य काँग्रेसमध्ये

गुलाम नबी आझादांना झटका! पक्षाचे ३० संस्थापक सदस्य काँग्रेसमध्ये
गुलाम नबी आझादा यांना झटका

गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रेटिक आझाद पार्टी अर्थात DAP या पक्षाला झटका लागला आहे. ३० हून अधिक संस्थापक सदस्यांनी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या ३० जणांमध्ये पक्षाचे सरचिटणीस निजामुद्दीन खटाना यांचांही समावेश आहे. गुलाम नबी आझाद यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. आपल्या पक्षाच्या नोंदणीसाठी गुलाम नबी आझाद निवडणूक आयोगात बोलावलं आहे. त्याचदिवशी ही घटना समोर आली आहे.

DAP च्या एका वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे की गुलाम नबी आझाद यांना मंगळवारी निवडणूक आयोगात बोलावलं होतं. डेमोक्रेटिक आझाद पार्टी हे नावही लोकांनी दिलं आहे. या नावावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.

मात्र याच पक्षाचे सरचिटणीस निजामुद्दीन खटाना यांच्यासह सुमारे ३० संस्थापक सदस्य काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. काश्मीरचे कोकेरनागशी संबंधित असलेले खटाना हे दोन वेळा आमदार होते. गेल्या वर्षी त्यांनी पीडीपी पक्ष सोडला आणि आझाद यांच्या पक्षात सहभागी झाले होते. निजामुद्दीन खटाना यांचा मुलगा गुलजार खटानाही काँग्रेसमध्ये गेले आहेत. यामुळे गुलाम नबी आझाद यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

गुलाम नबी आझाद यांचा पक्ष स्थापन झाल्यापासून तीन महिन्यातच अनेक लोक पक्ष सोडून जात आहेत. यावर जयराम रमेश यांनी ट्विट करत DAP म्हणजे डिसअपियिरिंग आझाद पार्टी असं आहे असं ट्विट केलं होतं. याआधी १७ जणांनी गुलाम नबी आझाद यांचा पक्ष सोडला होता. आता आज ३० संस्थापक सदस्यांनी पक्ष सोडला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 19:08 IST

संबंधित बातम्या