नागपूर: राजकारणात कार्यरत प्रत्येक कार्यकर्त्याचे आमदार होण्याचे स्वप्न असते. काही जणांना ही संधी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून मिळते, तर काहींना निवडणूक न लढवता विधान परिषदेतून स्वप्न पूर्ण करता येते. विधान परिषदेला “वरिष्ठांचे सभागृह” म्हणत असले तरी, प्रत्यक्ष राजकारणात विधानसभेलाच अधिक महत्त्व दिलं जाते.
हेच वास्तव आता विधान परिषद सदस्यांच्या जिव्हारी लागले आहे. “आम्ही येथे येऊन चूक केली का?” असा उदिग्न करणारा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेतकरून सरकारलाच घरचा आहेर दिला.
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असूनवे गवेगळ्या कारणांनू ते चर्चेत आहे. दर अधिवेशनात केला जाणारा विरोधी पक्षातील आमदारांना निधी दिला जात नाही, हा आरोप या अधिवेशनात ही विरोधी पक्षाकडून केला जात आहे. मात्र त्याच बरोबर विधानपरिषद आणि तेथील सदस्यांना सरकार गांभीर्याने घेत नाही हा सत्ताधारी पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केलेला आरोप नव्या वादाला तोंड फोडणारा ठरला आहे.
परिणय फुके हे विधान परिषदेत भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व करीत असले तरी त्यांची राजकीय सुरूवात नागपुरातून सुरू झाली. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी फुके यांना राज्य मंत्री केले होते. विधान परिषद सदस्यत्वाची ही त्यांची दुसरी वेळ आहे. त्यांना परिषदेच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या सारख्या अनुभवी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदाने “आम्ही येथे येऊन चूक केली का?” असा प्रश्न करावा हे दुर्लक्षित करण्यासारखे नाही.
त्यांचे हे विधान केवळ वैयक्तिक निराशा नसून यामुळे संपूर्ण विधान परिषदेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहाते. मंत्र्यांकडून आणिअधिकाऱ्यांकडून विधानपरिषद सदस्यांना गांभीर्याने घेतले जात नाही असा त्याचा आरोप आहे केला.
काय म्हणाले फुके?
फुके म्हणाले, ” विधान परिषदेच्या सदस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. सभागृहात मंत्री येत नाही, अधिकारी उपस्थित राहात नाही. विधानपरिषद सदस्यांना विकास निधी दिला जात नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी मागितला तर कशाला हवा असे विचारले जाते.”
जिल्हा नियोजन समितीचा निधी विधानपरिषद सदस्यांना द्यायचा नाही, असा निर्णय झाल्याचे मी ऐकतो. हा चुकीचा निर्णय आहे. तुम्ही मागच्या दाराने आलात असे सांगितले जाते. विधान परिषदेत येणारा प्रत्येक सदस्य एक किंवा अनेक जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतो. त्यांचे मोठ्या संख्येने समर्थक असतात. त्यांना आमच्याकडून अपेक्षा असते. प्रत्येक जण आप आपल्या पक्षाची बाजू सभागृहात मंडतो त्याचा फायदा पक्षाला निवडणुकीत होतो.
मात्र येथे दुजाभाव केला जातो. औचित्याच्या मुद्यावर उत्तरे येत नाहीत, लक्षवेधी सूचना मांडल्यावर संबधित विषयाची वस्तू स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास माहिती दिली जात नाही. आपण येथे येऊन चूक केली का? असे वाटायला लागले आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर ही वेळ आली आहे. स्वतः च्या अधिकारासाठी लढण्याची वेळ विधानपरिषद सदस्यांवर आली आहे, असे फुके म्हणाले.
नव्या वादाला तोंड?
या फुके यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे, विधान परिषद केवळ औपचारिकतेपुरती उरली आहे का? असा सवाल केला जात आहे. सत्ताधारी पक्षाचेच सदस्य असं म्हणत असतील, तर विरोधकांच्या तक्रारींना वजन मिळणं साहजिकच आहे. विधान परिषदेच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्नही उपस्थित होतो.