मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेची सत्ता भाजपच्या हाती देण्याचे आवाहन करतानाच मुंबईतील झोपडपट्टीवासी, गोरगरीब, तसेच फेरीवाल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साद घातली. या वर्गाला पंतप्रधान स्वधन निधी योजनेतून पैसे हस्तांतरित करीत ही मतेही भाजपच्या परड्यात पडतील, अशी खेळी केली आहे.

केंद्र व राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने त्याचा फायदा झाला. त्याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेची सत्ता द्या, असे अप्रत्यक्ष आवाहन मोदी यांनी केले. समर्पित भावनेने काम करणाऱ्यांच्या हाती सत्ता दिल्यास मुंबईचे चित्र बदलेल, असा संदेश देत भाजपच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन मोदी यांनी केले. मधल्या काळात राज्यात डबल इंजिन सरकार नव्हते त्यामुळे राज्यातील विकास खुंटला होता, असे सांगत मोदी यांनी सारे खापर शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवर फोडले.

Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला
AAP leader Kailash Gahlot
‘आप’ पक्षाला आणखी एक धक्का? मद्य धोरण प्रकरणात आणखी एक मंत्री ईडीसमोर हजर

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्या पुत्राची निवडणूक रिंगणात उडी

मुंबईतील झोपडपट्टीवासीय, फेरीवाले, टपरीधारक, गोरगरिबांची मते निर्णायक असतात. हा वर्ग मोठ्या प्रमाणावर मतदानाला बाहेर पडतो. या वर्गाला चुचकारण्याचा मोदी यांनी प्रयत्न केला. पंतप्रधान स्वधन निधी योजनेतून आधीच्या सरकारमुळे मदत मिळाली नाही, असे स्पष्ट करीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीवर सारे खापर फोडले. स्वधन निधी योजनेतून पैसे लगेचच खात्यात हस्तांतरित होतील, असे सांगत या वर्गाची मते मिळतील या दृष्टीने पावले मोदी यांनी टाकली.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे बहुमत तरीही अडचणीतील ‘महानंद’ची सूत्रे विखेंच्या हाती

मुंबईत झोपडपट्टीवासीय, टपरीधारक, फेरीवाले यांची संख्या लक्षणीय आहे. मध्यमवर्गापेक्षा हा वर्ग मतदानाला अधिक उतरतो. हे लक्षात घेऊन मोदी यांनी या वर्गाला साद घातली आहे.