पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी देशातील सैनिकांसोबत दिवाळी हा सण साजरा करतात. दिवाळीच्या दिवसांत ते सैनिकांशी गप्पा मारतात. त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे वर्ष काहीसे वेगळे असणार आहे. नरेंद्र मोदी यावेळी दिवाळीनिमित्त केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे भेट देणार आहेत. तसेच ते अयोध्या येथेही जाणार असून राम मंदिर उभारणीच्या कामाची माहिती घेणार आहेत.

हेही वाचा >> 2020 Delhi Riots : उमर खालिदला दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका, जामीन याचिका फेटाळली

PM Narendra Modi in Nagpur
पंतप्रधान नागपुरात, शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा
lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ऑक्टोबर रोजी केदारनाथ दौऱ्यावर असतील. येथे ते वेगेवगेळ्या विकासकामांचा शुभारंभ करतील. याशिवाय ते येथील इतर विकासकामांचाही आढावा घेतली. तसेच २२ ऑक्टोबर रोजी ते बद्रीनाथला रवाना होतील. पुढे २३ ऑक्टोबर रोजी ते अयोध्येला रवाना होतील. येथे ते राम मंदिराच्या उभारणीबाबतचा आढावा घेतील. संध्याकाळी ते शरयू नदीवर आरतीसाठी उपस्थित राहतील. ‘राम की पायरी’ येथे होणाऱ्या दीपोत्सवालाही ते उपस्थित असतील.

हेही वाचा >> जयललिता यांचा मृत्यू नेमका कसा झाला? चौकशी आयोगाचा अहवाल सादर; चार व्यक्ती कारणीभूत ठरल्याचा दावा!

दरम्यान, मागील ८ वर्षांपासून ते सैनिकांसोबत दिवाळी सण साजरा करत आले आहेत. मात्र सध्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तर गुजरातच्या निवडणुकाही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या कारणामुळेही यावेळी मोदी यांनी वेगवेगळ्या मंदिरांना भेट देत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.